newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला ती बातमी खोटी, न.पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची माहिती.

- Advertisement -

मागील दोन – तिन दिवसापासून सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला अशी वार्ता पसरवली जात असून ती बातमी खोटी असल्याचे सांगत असा कुठलाही प्रकार घडलेला नाही अशी माहिती पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिली आहे.

याबाबत स्मशान भूमी मध्ये मृतदेह पेटवण्यासाठी ज्या इसमाला रीतसर कायद्यानुसार ठेका देण्यात आला आहे. तसेच सुरज चांगरे उर्फ भैरू व ठेकेदार जावेद शेख,विजू भोई व इतर इसमांची विचारपूस केली असता असा कुठलाही प्रकार याठिकाणी झालेला नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच या प्रकारचे वृत्त कोणीही सोशल मीडियावर अथवा वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करू नये व कोविड-१९ सारख्या महामारी मध्ये शासनाला सहकार्य करावे असे पाचोरा मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी कळविले आहे.

- Advertisement -