newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पाचोरा – भडगाव नगरदेवळा पोलीस निवासस्थानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – आमदार किशोर पाटील

- Advertisement -

पाचोरा – भडगाव नगरदेवळा पोलीस निवासस्थानाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – आमदार किशोर पाटील
पाचोरा – पाचोरा – भडगाव – नगरदेवळा येथे असलेल्या पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या विषयाला प्राधान्य क्रम देत आमदार किशोर पाटील यांनी पाठपुरावा करीत दिनांक १२.०१.२०२१ रोजी मंत्रालयात गृह राज्यमंत्री ग्रामीण नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होऊन लवकरच हा प्रश्न सोडविण्यात असल्याचा हिरवा कंदील मंत्री महोदयांनी दिल्याने पोलीस कर्मचार्याना संक्रातीच्या पूर्वीच गॉड बातमी मिळालेली आहे.
मतदार संघातील पोलीस कर्मचार्याना स्वछ सुंदर व सुसज्य असे निवास स्थान मंजूर व्हावे यासाठी आमदार किशोर पाटील हे गेल्या ४ वर्षांपासून पाठपुरावा करीत होते या पाठपुराव्याला यश मिळाले असून गृह राज्य मंत्री ग्रामीण नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी शालेय मंत्री नामदार बच्चू कडू, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनिल बाबर, महाराष्ट पोलीस गृह निर्माण व कल्याण महांडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगनाथन, उप सचिव व्यंकटेश भट, सुनील बागुल, हरेश्वर सहाणे, राजू पाटील स्वीय सहायक आदी उपस्थित होते.
यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघातील पाचोरा व नगरदेवळा येथील निवासस्थान पहिल्या टप्प्यात करावी. तदनंतर पोलीस कार्यालयाची निर्मिती होणार असून पोलिसांच्या निवास्थानाचा प्रश्न मार्गी लागल्याने मतदार संघातील पोलीस कर्मचाऱ्याकडून आमदार किशोर पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisement -

- Advertisement -