bgchjgchkg fvhgvhgvhgvhjkgvjkhgvjhgvjh
पारोळ्यात शितल अकँडमीच्या इंग्लिश स्पिकिंग अँपचा शुभारंभ
-शितल अकँडमीच्या मोबाईल अँप द्वारा आता इंग्लिश बोलणे शिका कुठेही केंवाही
पारोळ्यात शितल अकँडमीच्या इंग्लिश स्पिकिंग अँपचा शुभारंभ
पारोळा – आजच्या आधुनिक युगात स्पर्धात्मक जीवनात वाटचाल करतांना कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे.यात भाषा कौशल्य असले कि गुणात्मक दर्जा स्वत: चा विकास करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतांना खडतर प्रवासातुन मार्ग काढीत यश संपादन करतांना समस्यांचे आपोआप निराकरण होत असते.
गेल्या 31 वर्षापासुन भारतातील मातृभाषेतुन इंग्लिश स्पिकींग शिकविणारी एकमेव संस्था म्हणुन लौकीक मिळविलेल्या शितल अँकँडमीने आजवर 25 लाख लोकांना इंग्रजी भाषा बोलण्यात व कृतीत आणण्यात मोठे योगदान दिले आहे.यात विकासाचे एक पाऊल पुढे टाकतांना संशोधन व अनुभवाने वल्ड क्लास सिस्टम मोबाईल अँप विकसित करुन भाषेच्या या पर्वात नवा बदल आणल्याने सर्वच वयाच्या 8 वर्षापासुन ते 60 वर्षापर्यत कुणीही कुठेही व केव्हाही इंग्लिश स्पिकींग शिकु शकेल असे अँप विकसित करुन हे विकासात्मक पाऊल पुढच्या पिढीसाठी फलदायी ठरेल असे मत शितल अँकँडमीचे संचालक रविंद्र पाटील यांनी सांगितले.
येथील अँकँडमीच्या शाखेत सर्व वयोगटास उपयुक्त ठरणार्यी मोबाईल अँपच्या गुणात्मक वैशिष्ट्ये व अँप शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी टायगर किडस् चे संचालिका रुपाली पाटील यांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
भारतातील गरजु विद्यार्थ्यासह इंग्लिश भाषेची आवड असणार्यांना ही भाषा सहज अवगत व्हावी.यासाठी शितल अँकँडमीचे जनक केतन शहा यांनी इंग्लिश स्पिकींग कोर्सला सुरुवात केली.त्यांच्या कार्याला गतीमानता आणणेसाठी रविंद्र पाटील यांची मौलिक भुमिका आहे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी रविंद्र पाटील म्हणाले कि, अँकँडमीच्या माध्यमातुन खानदेशात प्रत्येक तालुक्यात शाखेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा उंचावणेकामी शाखाप्रमुख सर्व शिक्षक वर्ग मोलाची भुमिका निभावीत आहे.कोरोना काळात विद्यार्थी वा इंग्लिश स्पिकींग कोर्स शिकणारे यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये यासाठी आँनलाईन शिक्षण प्रणालीतुन अध्ययनात सातत्य ठेवत विद्यार्थ्यासह नोकरी करणारे,व्यावसायिक ,गृहीणी यांचेसाठी कौशल्यपुर्ण नियोजन करित अभ्यासाची उणीव भासु दिली नाही.आजच्या व्हाटसअप व गुगल युगात क्षणात माहीती मिळविणे सोयीचे झाले आहे.यामुळे इंग्लिश बोलणे,लिहणे व व्यवहारात कृतीत आणणे सोयीचे जावे यासाठी वयाच्या 8ते वयाच्या 60 वर्षापर्यतच्या नागरिकास आता कुठेही केव्हाही व कधीही शितल अँकँडमीच्या मोबाईल अँपमधुन इंग्लिश स्पिकींग करणे सोपे जाणार असल्याने या आधुनिक युगात अँकँडमीने प्रगतीचे एक पाऊल टाकीत कोर्स युगात क्रांतीकारी बदल घडवित नागरिकांच्या मनात आपलेपणा निर्माण केला असल्याने या अँपला सर्वस्तरातुन मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येते.
दरम्यान अँप साठी गूगल प्ले स्टोर ला सर्च करा Sheetal Academy Download करा फ्री..फ्री..फ्री.. व अधिक माहिती साठी संपर्क करण्याचे आवाहन रविंद्र पाटील यांनी यावेळी केले.