bgchjgchkg fvhgvhgvhgvhjkgvjkhgvjhgvjh
महा एनजिओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह विवेकानंद पुरस्कर २०२१ मयुर बाळकृष्ण बागुल यांना प्रदान करण्यात आला.
महा एनजिओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह विवेकानंद पुरस्कर २०२१ मयुर बाळकृष्ण बागुल यांना प्रदान करण्यात आला.
पुणे- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजातील सामजिक कार्यकर्ते यांना महा एनजिओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराच्या वतीने विवेकानंद हा पुरुषांसाठी व जिजाऊ पुरस्कार हा महिलांसाठी मागील ७ वर्षापासून देण्यात येतो. अमळनेर शहरातील साप्ताहिक उदयकाळ वृत्तपत्राचे संपादक मा. श्री. बाळकृष्ण बागुल यांचे जेष्ठ चिरंजीव मा. मयुर बाळकृष्ण बागुल (समाजकार्य) ह्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन महा एनजिओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराच्या वतीने विवेकानंद पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. सदरील पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्य करणारे प्रतिनिधी यांची निवड समिती गठीत करून पुरस्कार जाहीर करण्यात आले. पुरस्कार स्वीकारतांना मयुर बागुल यांनी सांगितले कुटुंबात सामजिक संस्कार घडल्यामुळे आपण समाजचे देणे लागतो. स्वता पुरता जीवन जगत असतांना आपण दुसऱ्यांच्या देखील विचार केला पाहिजे. देशात व समाजत प्रगती घडवायची असेल तर निसंकोच पणे कार्य केले पाहिजे हि जिद्द व इच्छाशक्ती असल्याने त्यांचे कार्य वाढत आहे. समाजकार्य क्षेत्रात गेली दहा वर्षापासून विविध सामजिक संस्था ह्यांच्या सोबत काम करत असतांना विशेषतः ग्रामीण भागात काम करण्याची गरज आहे या उद्देशाने त्यांनी सहा वर्षापासून ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, जन – जागृती, पर्यावरण – पाणी या विविध उपक्रम सुरु केले. समाजात बदल व परिवर्तन घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणत कार्यारत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होणे अपेक्षित होते. पुरस्कार स्वीकारतांना हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेऊन सोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. कुठलेच कार्य पुरस्कार घेण्यासाठी करत नाही परंतु आपल्यावर लोकांचा विश्वास असल्याने व समाजात चांगले परिवर्तन व बदल घडवून आणण्याची अपेक्षा असते त्यामुळे पुरस्कार घेऊन अधिक जबाबदारीने कार्य करण्यास पाठबळ मिळते.
हा पुरस्कार सोहळा दि. १२ जानेवारी २०२१ रोजी पुणे शहरातील पत्रकार भवन येथे पार पडला. पुणे शहरातील प्रथम नागरीक महापौर मा. श्री. मुरलीधर मोहोळ, मनपा. पुणे, मा. कृष्ण प्रकाश, आय. पी. एस. – पोलिस आयुक्त, पिंपरी – चिंचवड, मा. सौ. प्रेमा पाटील – पोलिस अधिकारी, मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्स ब्रेवरी व मा. श्री. शेखरभाऊ मुंदडा, संस्थापक अध्यक्ष - महा एनजिओ फेडरेशन, पुणे, मा. श्री. सुनिल जोशी, अध्यक्ष – समग्र नदी परिवार, पुणे व मा. श्री. विजय वरूडकर, अध्यक्ष - सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह, मा. श्री. मुकुंदराव शिंदे – जेष्ठ – समाजकार्यकर्ते या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. समाजकार्य क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती यांचा सन्मान करणे हे महा एनजिओ फेडरेशन व सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह परिवाराचे कार्य मागील ७ वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रातील १५०० सामजिक संस्थेची पुस्तिका प्रकाशित केली असून सामजिक संस्थेला येणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी सामजिक संस्थे सोबत राहून काम करत असते.
मयुर बाळकृष्ण बागुल यांना विवेकानंद पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा व कौतुक होत आहे.