newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

3 जानेवारी क्रांतीजोती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त,शासनाने मान्यता दिलेला प्रथम महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आलाः

- Advertisement -

3 जानेवारी क्रांतीजोती सावित्रीमाई फुले जयंती निमित्त,शासनाने मान्यता दिलेला प्रथम महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आलाः

- Advertisement -

पाचोरा: पीपल्स बँक पाचोरा येथे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज जन्म उत्सव समिती पाचोरा,व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव,तसेच कलावंत शाहिर परीषद महाराष्ट्र राज्य जळगाव, व माळी समाज पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने, क्रांतीजोती सावित्रीमाई फुले जंयती निमित्ताने प्रतिमा पुजन,व अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने नुकताच सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिन ‘महीला शिक्षण दिन’ म्हणून मंजूर करण्यात आला. त्या बद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार सर्वे सामाजिक संघटनांच्या वतीने,समता परिषदेचे जिल्हा संघटक,कलावंत शाहिर परिषदेचे जळगाव जिल्हा सरचिटणिस,शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांनी मनोगतातुन शासनाचे आभार मानुन कार्यक्रमाची सुरूवात केली ,तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी पोवाडा सादर करून क्रांतीचा इतिहासाला नविन उजेळा देवून समाज प्रबोधन केले, प्रमुख उपस्थीती,उत्सव समितीचे अध्यक्ष,अनिल मराठे साहेब,उपाध्यक्ष गजानन पाटील,कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील,सचिव विनायक राऊतराय साहेब,रविंद्र रामकृष्ण पा.राजेंद्र एस.पा.रविंद्र पाटील,माळी संघटनेचे जिल्हा सल्लागार मधुकर रामदास महाजन नाना,प्रमोद महाजन सर,माळी पंच मंडळाचे सचिव गजानन महाजन सर,रविंद्र पाटील फौजी,दिपक भावराव शेवरे,फुलसिंग आप्पा पाटील,सचिन पाटील,संदीप तांबे सर,भिकन पाटील,हर्षल सैंदाणे,संतोष पाटील गोराडखेडा,प्रमोद बारी,प्रकाश मराठे,भैय्या महाजन सावकार महाजन निंभोरा, सर्वे बहुजन समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते कर्यक्रमाला उपस्थीत होते,

- Advertisement -