क्राईम जगतजळगाव जिल्हापाचोरा-भडगाव

कुऱ्हाड येथील डॉ. महाजन यांच्या गोठ्यातील दहा शेळ्यांची चोरी.

कुऱ्हाड येथील डॉ. महाजन यांच्या गोठ्यातील दहा शेळ्यांची चोरी.

दिनांक~०७/०१/२०२१ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील प्रगतीशील शेतकरी डॉक्टर प्रदिप दिनकर महाजन यांचा पाचोरा रस्त्यावर कुऱ्हाड गावाजवळ गुरांचा गोठा असून या गोठ्यात ते शेती उपयोगी साहित्य, शेतीमाल ठेवत असत तसेच गायी, म्हशी, बैलजोडी व शेळ्या बांधत होते.
याच गोठ्यातुन बुधवार रात्री ते गुरुवार सकाळपर्यंत गोठ्यात कुणीही नसल्याचा फायदा घेत या गोठ्यातील अंदाजे एकलाख रुपये किंमतीच्या दहा शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ही बाब महाजन परिवारातील काही सदस्य सकाळी गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले असता लक्षात आली. विशेष म्हणजे गोठ्याजवळ गाडीचे टायर उम शेळ्याच चोरण्यासाठी पिकअप सारख्या लहान टेम्पो वाहनाचा वापर केला असावा असा संशय आहे.
[सद्या सगळीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा धूमधडाका सुरू असून मत मिळवण्यासाठी ओल्या पार्ट्यां करण्यासाठी मटन, मच्छी, कोंबड्या, बकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात बळी जात असून सोबतच ऐपतीप्रमाणे व मतदात्याच्या लायकी प्रमाणे गावठी, इंग्लिश व देशीदारु पाजली जात असल्याने सद्यातरी बकऱ्या , कोंबड्यांना जास्त मागणी वाढली असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close