संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीमेत तालुक्यात दीडलाखाच्यावर नागरिकांची तपासणी,सर्वेश्वर संस्थेकडुन 400 घरांना गृहभेटी

0 621

संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीमेत तालुक्यात दीडलाखाच्यावर नागरिकांची तपासणी,सर्वेश्वर संस्थेकडुन 400 घरांना गृहभेटी
पारोळा –
जिल्हा चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार तालुक्यात आशा स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी अश्या 184 तर शहरात 6 व सर्वेश्वर बहुउद्देशिय विकास संस्था मिळुन तालुक्यात 1 लाख 66हजार 874 उद्दीष्ट असतांना ता,16 पर्यत 1लाख 57 हजार 461 नागरिकांची संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण मोहीमेत आरोग्य तपासणी करण्यात आली.यात शहरात टिम क्र 4 यात सर्वेश्वर बहुउद्देशिय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय रामकृष्ण पाटील व सचिव आशा संजय पाटील यांनी 16 दिवसात 400 घरांना गृहभेटी देत 2010 नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.ता,31 डिसेंबर पर्यत राहीलेल्या नागरिकांची तपासणी करित थुंकी व एक्स रे तपासणी कुटीर रुग्णालयात मोफत केली जाणार आहे.याबाबत नागरिकांनी मोहीमेचा लाभ घेतला काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी केले आहे.
दरवर्षी क्षयरोग तपासणी मोहीम राबविली जात असते.मात्र या वर्षी कृष्ठरुग्ण व क्षयरुग्ण असे दोन आजारांची संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली.

तालुक्यातील आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या तपासणी मोहीमेत 158 जण संशयित आढळुन आले.तर एक्सरे मध्ये 44 जण संशयित आढळुन आले.यात प्रयोग शाळा तपासणीत क्षयरुग्ण 8 तर कृृ्ष्ठरुग्ण 7 जण आल्याने यांच्यावर तात्काळ उपचार करुन डाँक्टरांनी औषधोपचार बाबत मार्गदर्शन केले.

शहरात पाच टिमने 8500 नागरिकांचे केले सर्वेक्षण
संयुक्त क्षय व कृष्ठ रुग्ण तपासणी मोहीमेत ता,17पर्यत पाट टिम ने 8500 नागरिकांची तपासणी केली.यात 1700 घरांना गृहभेटी देत 22जण संशयित आढळुन प्रत्यक्षात 2 जणांवर उपचार सुरु आहेत.

सर्वेक्षण कामी टिम सदस्य अमोल महाले,आशा सोनवणे,प्रेमराज वानखेडे,कल्पना हातागडे,करुणा पवार,राखी बडगुजर,सर्वेश्वर संस्थेचे संजय पाटील,आशा पाटील यांनी कोरोना काळात शासनांच्या नियमांचे पालन करित नागरिकांची आरोग्य तपासणी केली.


तपासणी मोहीमेत सर्वेश्वर संस्थेची कामगिरी कौतुकास्पद – डाँ योगेश साळुंखे
आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना वैद्यकिय क्षेत्रात कसे प्रत्यक्षपणे सेवा द्यावी लागते.याची जाणीव आहे.परंतु कोरोना काळात देखील शहरातील सर्वेश्वर बहुउद्देशिय संस्थेने क्षयरुग्ण सेवेची परंपरा कायम ठेवत या सर्वेक्षण मोहीम सहभाग घेत 2010 लोकांची आरोग्य तपासणी करित आरोग्य यंत्रणेत सहकार्य केले.ही बाब कौतुकास्पद असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी करित कुटीर रुग्णालय अंतर्गत डाँटस् प्रोव्हाईडर म्हणुन सेवा देत असलेले संजय पाटील व त्यांना सहकार्य करणार्या त्यांच्या पत्नी आशा पाटील यांचे योगदान अभिनंदनीय असल्याचे ते म्हणाले.

संयुक्त कृृष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणी मोहीमेचा समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कुटीर रुग्णालयाचे डाँ प्रशांत सोनवणे,डाँ राजेश वाल्डे,डाँ नईम बेग,डाँ विजय पाटील,प्रयोग शाळा तंत्रज्न बी टी पाटील,क्षयरुग्ण तालुका पर्यवेक्षक आर जे सातपुते,पर्यवेक्षक भगवान चौधरी,राजेंद्र चंद्रात्रे, आय सी टी सी विभागाचे नामदेव अहीरे,किशोर पाटील,दिपक सोनार उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी तपासणी मोहीमेचे टँली शिट कुटीर रुग्णालयात दिले.
यावेळी उपस्थित डाँक्टरांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करित सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचालन संजय पाटील तर आभार भगवान चौधरी यांनी मानले.
छाया – सर्वेश्वर संस्थेने केलेल्या तपासणी मोहीमेचे टँलीशिट वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांना देतांना संजय पाटील शेजारी डाँ विजय पाटील,डाँ प्रशांत सोनवणे व भगवान चौधरी

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.