वाढदिवसा निमित्त अमळनेर येथील गुप्तवार्ताचे पोलिस कॉन्स्टेबल डॉ शरद पाटील व पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांनी केले रक्तदान !

0 573

वाढदिवसा निमित्त अमळनेर येथील गुप्तवार्ताचे पोलिस कॉन्स्टेबल डॉ शरद पाटील व पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांनी केले रक्तदान !

अमळनेर येथिल पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे साहेब यांनी आज रक्तदान केले तसेच गुप्तवार्ताचे पोलिस कॉन्स्टेबल डॉ शरद पाटील (P H D) यांनीही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान केले.रक्तदान चळवळ अमळनेर मध्ये रुजविणारे आणि जनतेला रक्तदानासाठी प्रोत्साहित करणारे मनोज शिंगाणे यांच्या सहकार्याने रक्तदान कार्यक्रम पार पडला.
यावेळी अमळनेर मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रा जयश्री दाभाडे, राहुल पाटील, महेश पाटील, भरत पवार, पत्रकार ईश्वर महाजन,पत्रकार मनोज चित्ते,भूषण भदाणे, हिरालाल पाटील, विजू मास्टर डॉ . पिंगळे, नावीद शेख, गोविंदा बाविस्कर, शरद आबा, सईद तेली इ नी शुभेच्छा दिल्या.

पोलिस निरीक्षक श्री अंबादास मोरे साहेब हे नेहमी रक्तदान करीत असतात, तसेच यावेळी सर्वाना रक्तदानाचे महत्व सांगतांना दर तिन महिन्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले . गुप्तवार्ताचे पोलिस कॉन्स्टेबल डॉ शरद पाटील (P H D) यांनीही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान केले. व युवकांसमोर एक आदर्श ठेवत त्यांचा वाढदिवसानिमित्त पोलिस निरीक्षक यांनी व मित्र परिवाराने केल्या या कार्यामुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी सर्व पक्षीय व सामाजीक कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला.
यावेळी हिरालाल पाटील, राहुल कंजर,गौरव पाटील, यश वर्मा, शरद आबा, अशा असंख्य युवा सामाजीक व राजकीय कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला..

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.