newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

चिंचखेडा येथे भरदिवसा ५ लाख ५० हजाराच्या ऐवजासह २० हजाराची रोकड लंपास.

- Advertisement -

योगेश पाटील .(पाचोरा) दिनांक~०८/१२/२०२० चिंचखेडा येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात घुसुन ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख लांबविल्याची घटना घडली असुन पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचखेडा खु” येथील प्रकाश पाटील यांचे रस्त्याला लागुनच घर आहे. काल घरात कुणीच नसतांना अज्ञात चोरट्याने शिताफीने घरात प्रवेश करुन घरातील गोदरेज कपाटातील ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे २ जोड टोंगल, १० हजार रुपये किंमतीचे कॅप, २० हजार रुपये किंमतीचे डोरल पोत, ७२ हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २० हजार रुपये किंमतीचा चपला हार, ४० हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र, ३६ हजार रुपये किंमतीच्या दोन जोड बाळ्या, २० हजार रुपये किंमतीची अंगुठी, १२ हजार रुपये किंमतीचे कानातील एक जोड, अशा ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख असे मिळुन ५ लाख ७० हजाराचा ऐवज लंपास केलल्याची घटना घडली.
घरातीलच एका छोट्या लेदर बॅगेत ठेवलेले एक सोन्याची चैन, एक नैकलेस व दोन अंगठ्या, एक सोन्याची कॅप व ३ हजार रुपये रोख मिळुन आले आहेत.
प्रकाश पाटील यांना काल सायंकाळी लक्षात आल्याने त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहे. गावात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

- Advertisement -