newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

दिव्यांग संशोधन समित्यांवरअशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

- Advertisement -

दिव्यांग संशोधन समित्यांवरअशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

- Advertisement -

जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा) – राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्यादृष्टीने या मंडळ/समित्यांचे पुर्नगठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील 66 च्या उपकलम 2 मधील (ई) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. असे विजय रायसिंग, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.

- Advertisement -