newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

- Advertisement -

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

- Advertisement -

जळगाव, दि. 27 – कोविड-19 साथरोगापुर्वी व कोविड-19 साथरोगानंतर हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क ( 2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिनांक 30 जून, 2020 नंतर केंद्र शासनाचेही यांच्या किंमतीवरील नियंत्रण संपुष्टात आल्याने तर किमतीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले असून याचा भुर्दड सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी याचा उपयोग आवश्यक असल्याने हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किमती नियंत्रणात ठेवणे जनहितार्थ आवश्यक होते. त्यासाठी शासन निर्णयानुसार हॅन्ड सॅनीटायझर व नोज मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांचे दर निश्चित करणेसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. उत्पादकाची उत्पादन किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य 19 रुपयांपासून 127 रुपयांपर्यंत निश्चित केले आहे. शासन निर्णयानुसार या विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यत लागु राहील. सदर अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागु राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत जनतेस दिसेल, अशा ठिकाणी दर्शनीय भागावर लावणे आवश्यक आहे. याबाबत काही तक्रार आल्यास किंवा तपासणी दरम्यान वर नमुद सुचना दर्शनीय भागास आढळून न आल्यास कोवीड साथरोग कायदा व औषधे व सौदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत कडक कारवाई करण्यात येईल. याची सर्व मास्क उत्पादक कंपन्या/वितरक/किरकोळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी. असे अ. मा. माणिकराव, औषध निरीक्षक, सहाय्यक आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisement -