newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे पाचोऱ्यात भाजपातर्फे स्थगिती आदेश जाळून आंदोलन !

- Advertisement -

कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे पाचोऱ्यात भाजपातर्फे स्थगिती आदेश जाळून आंदोलन

पाचोरा- भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.खासदार उन्मेष पाटील किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटातात्या भोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे शहराध्यक्ष रमेश वाणी यांच्या नेतृत्वात केंद्रीय कृषी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे स्थगिती आदेश जाळुन आंदोलन करण्यात आले,मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विषयक शेतकरी उत्पादक व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक २०२० हे दोन विधेयक मंजूर झाले असून हे विधेयक म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातला हा ऐतिहासिक निर्णय आहे.यामुळे शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे.शेतकरी स्वातंत्र्याच्या नवीन पहाटेचा उदय झालेला आहे. असे यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले.
तसेच शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या घामाचा पूर्ण दाम मिळणार आहे.आता खऱ्या अर्थाने शेतकरी आझाद झालेला आहे. या विधेयकामुळे

- Advertisement -

१) देशातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२) शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तर होणारच आहे त्यांचे कल्याण सुद्धा होणार आहे.
३) शेतकरी कित्येक दशकांपासून अनेक प्रकारच्या बंधनात अडकलेले होते त्यांना माध्यस्थांचा (दलालांचा) सामना करावा लागत होता. यातून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे.
४)शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या प्रयत्नाला हातभार लागणार आहे.
५) किमान हमी भावात शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी केला जाईल,सरकारची खरेदी सुरू राहील.
६) आर्थिक विकासाचा मार्ग मोकळा होईल हे विधेयक शेतकऱ्यांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल.
७) देशातील कोणत्याही भागात शेतकऱ्यांना आपली उत्पादने विकता येतील.आणि शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची तरतूद यात आहे.

तरी केंद्र शासनाने लागू केलेली कृषी विधेयकासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेली स्थगिती उठवून तातडीने ही विधेयक राज्यात लागू करावी अशा मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी मा.तहसीलदार पाचोरा यांना दिले याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील कृ.उ.बा.समिती मा.सभापती सतीश शिंदे सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,दिपक माने,राजेश संचेती,भरतजीभु पाटील, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष मुकेश पाटील,शहर युवामोर्चा अध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस भैया ठाकूर,कुमार खेडकर,राहुल गायकवाड,विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,भैया चौधरी,बंटी राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.,

- Advertisement -