bgchjgchkg fvhgvhgvhgvhjkgvjkhgvjhgvjh
कठीण काळातील सर्वांचे कार्य प्रेरणादायी , नामदार वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन !
कठीण काळातील सर्वांचे कार्य प्रेरणादायी , नामदार वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन
*प्रतिनिधी = जळगाव – दिनांक 20 – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने जळगाव ,जालना जिल्हा शाखेसह राज्य शाखा द्वारे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने शाल फेटा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय कोविड कोरोना योद्धा सन्मान सन्मानपत्र स्मृतिचिन्ह मानाचा फेटा बहाल करून श्रमिक कायदा कामगार अॅक्ट खाली नोंदणी झालेल्या महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव ,राज्यमहासचिव तथा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकताच मराठवाडा मुक्ती दिनी चितळी पुतळी जिल्हा जालना येथे केलाकेला. धारावी येथे धारावी पॅटर्न राबवून नामदार वर्षा गायकवाड यांनी कोरोणा नियंत्रणात आणला तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रथमच राज्यात पाच ते दहा सप्टेंबर थँक्स अ टीचर मोहीम राबवून शिक्षक व शिक्षण क्षेत्राचा सन्मान वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांचा जालना येथील चितळी पुतळी याठिकाणी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांचा को व्हि ड कोरोणा योद्धा 2020 म्हणून राज्यस्तरीय मानपत्र सन्मानपूर्वक बहाल करत हा सन्मान करण्यात आला. तसेच राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले नवनवीन शैक्षणिक प्रयोग शिक्षकांच्या प्रयोगांविषयी,शिक्षक सर्व अधिकारी सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या राबवत असलेल्या उपक्रमांविषयी तसेच ठिकठिकाणी शिक्षकांनी सुरू केलेल्या साप्ताहिक, दैनिक ,डिजिटल मासिक या शैक्षणिक उपक्रमात सहभाग कठीण काळात जेथे ऑनलाईन शक्य नाही तेथे प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांवर जात घरघर शाळा शिक्षण आपल्या दारी , विषय मित्र गल्ली मित्र मोहल्ला मित्र टीव्ही वरची शाळा सारखे प्रयोग,आपला जिल्हा आपला उपक्रम सारखे जिल्ह्यातील प्रयोग ऑनलाईन तसेच ऑफलाइन शिक्षण सुरू राहण्यासाठी होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग वेबिनार ,वेधग्रुप, व्हाट्सअप ग्रुप, महाराष्ट्र राज्य समता विभागाची बा ल रक्षक चळवळ, तेजस प्रकल्पातील टॅग कॉर्डिनेटर यांची भूमिका ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळई तालुका एरंडोल येथूनराज्यात सर्वप्रथम स्वेच्छेने आपण सुरू केलेल्या व सुरू केलेला सेमी इंग्रजी माध्यमाचा पॅटर्न व कासोदा बीटमध्ये झालेले सेमी इंग्रजी माध्यमाची संपूर्णसुरुवात, संघटनेत काम करत असतानाच राज्य महासचिव या नात्याने स्वतःची दोन्ही मुले जिल्हा परिषद शाळेत दाखल करून कृतीयुक्त पद्धतीने जिल्हा परिषद शाळा टिकवा अभियानाची शिक्षक या नात्याने किशोर पाटील कुंझरकर यांनी 2010 पासून सुरू केलेली कृतीयुक्त सुरुवात, राज्यभर फिरून सर्जनशील शिक्षक जोडो अभियान या शीर्षकाखाली त्यांनी राबवलेलीप्रबोधनाची मालिका, जीवन शिक्षण इतर मासिकांतून होणारे प्रबोधन,इतर ग्रुप तंत्रस्नेही शिक्षक प्रयोगशील शिक्षक यांचे संवाद कार्यक्रम शिक्षण गप्पा ,बैलपोळा व इतर सणातून बेटी बचाव बेटी पढाव शिक्षणाचा संदेश देण्याचा किशोर पाटील कुंझरकर यांचा उपक्रम,तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात व तालुका निहाय राज्यातील सर्व शिक्षक करत असलेले प्रेरणादायी कार्यसर्व सर्वांची माहिती लॅपटॉप च्या साह्याने पीपीटी तसेच प्रास्ताविक मनोगतातून प्रास्ताविकातून राज्य महासचिव या नात्याने स्वतः किशोर पाटील कुंझरकर यांनी मंत्री महोदयांना राज्यात सर्वत्र सकारात्मक शैक्षणिक उपक्रम व धडपड सुरू असल्याचा संदेश देण्यासाठी दिली . तसेच इतर देशात ज्याप्रमाणे शिक्षकांना व्हीआयपी दर्जा मिळतो त्याप्रमाणे आपल्या राज्यात देशात देखील मिळावा राज्यस्तरीय शिक्षक सर्व संवर्गाची प्रलंबित प्रश्न सुटावेत त्याच जोडीने विधानपरिषदेवर सदस्य आमदार म्हणून राज्यपाल नियुक्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना संधी मिळावी.डीसीपीएस धारकांच्या प्रश्न जुनी पेन्शन योजना लागू करावी बदली धोरणातील विस्थापितांचा प्रश्न अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने प्रास्ताविकातून राज्य महासचिव किशोर पाटील कुं झर कर यांनी केली असता नामदार वर्षाताई गायकवाड यांनी राज्यातील सर्व शिक्षकांविषयी आणि आता पाहिलेल्या उपक्रमांविषयी आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचे सांगतानाच आपल्या सर्व मागण्या सकारात्मक पद्धतीने मांडण्याचा शब्द दिला.सर्वांनी आपली व सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही त्यांनी नमूद केले.भविष्यात देखील राज्याला शिक्षणाच्या दृष्टीने प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी समन्वयात्मक कामाची गरज असल्याचे म्हटले. व त्यांनी शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पहिल्यांदाच झालेला सन्मान हा भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगतानाच हा सन्मान महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आरोग्य आणि शिक्षण सुरळीत राहण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व कोरोणा योद्धा तसेच शिक्षक,केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी ,डाय ट अधिकारी , एस सी ई आर टीचे अधिकारी,लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती यांना समर्पित केला असल्याचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांना म्हटले.राज्यातील 32 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन शिक्षण विभाग राज्य समन्वय समिती गठीत करून शिक्षकांचे प्रश्न व गुणवत्तेसाठी चे उपक्रम राबविले आहेत यावेळी किशोर पाटील कुंझर कर यांनी लक्षात आणून दिले.व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघासह, मागासवर्गीय शिक्षक संघासह केंद्रप्रमुख शिक्षक संघ सह राज्यातील 32 शिक्षक संघटनांचा देखील धावता परिचय करून दिला. तसेच शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अर्जुनराव साळवे अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व स्त्रिया सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व शिक्षक संघटनांचे व पक्षांचे लोकप्रतिनिधी सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सामाजिक संघटनात्मक क्षेत्रात आपले सरळ मार्गाने कार्य सुरू असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी भूमिका स्पष्ट करतानाम्हटले. त्यावेळी सर्व संघटनांच्या निवेदनावर चर्चा होऊन सर्वांचे प्रश्न मांडण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख संघाचे बाबुराव पवार मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे सरचिटणीस नाशिक येथील राजेंद्रजी म्हसदे त्याच जोडीने अच्युत साबळे परमेश्वर साळवे पियु आरसु ड, विलास इंगळे , राहुल वाहुले, लाजरस अल्लाट पि के सोनवणे पी डी चव्हाण केंद्रप्रमुख अजित बिदर कर, फय्याज शेख,आदी सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार राजेश भैय्या राठोड, त्याच जोडीने विशेष प्रशासन अधिकारी विजयजी भोसले यांचादेखील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने अरुण जाधव अध्यक्ष तसेच राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर व सर्व पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आलासंघटनेचे पदाधिकारी राजकिरण चव्हाण यांच्या वेबसाईटचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. केंद्रप्रमुख संघाचे नामदेवराव धुमाळ अण्णासाहेब खिल्लारे सिद्धाराम माशाळे ऋषिकेश वेदपाठक , आर जी जोशी, दत्ता माघाडे शांतीलाल खरात जाधव एस एस जाधव एसी गळधर शत्रुघ्न उबरहंडेउपस्थित होते. सोबत छायाचित्र जोडले आहे तीन
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने शाल फेटा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यस्तरीय कोविड कोरोना योद्धा सन्मान सन्मानपत्र स्मृतिचिन्ह मानाचा फेटा बहाल करून सन्मान करताना किशोर पाटील कुंझरकर , अरुण जाधव आणि सर्व सहकारी.