newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

- Advertisement -

जीवन गौरवचा अनोखा ऑनलाईन मुख्याध्यापक,शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न

ठाणे/प्रतिनिधी

- Advertisement -

ठाणे/प्रतिनिधी – जीवन गौरव सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा क्षेत्राला वाहिलेले मासिक मार्फत आयोजित ऑनलाईन शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा अंबरनाथ ठाणे येथे आँनलाईन संपन्न झाला.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ तालुक्यामध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी माननीय आशिष झुंजारराव गटशिक्षणाधिकारी अंबरनाथ यांच्या संकल्पनेतून गुगल मिट द्वारे अंबरनाथ तालुक्यातील शिक्षकांसाठी अनोखा शिक्षक दिन साजरा करून अनोखी भेट दिली .संपूर्ण तालुक्यातील गट वाईज सगळ्याच शिक्षक व विद्यार्थ्यांनीही छान छान उपक्रम घेतले व सर्वच तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी सहभागी झालेले दिसून आले. यामध्ये बाल केंद्राने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.ऑनलाईन मुख्याध्यापक व शिक्षकांचे गुप्त मतदान पद्धतीने मूल्यांकन करून त्यादिवशी अनोखा समारंभ घेतला या समारंभाचे सगळ्यां नीच खूप कौतुक केले जीवन गौरव ऑनलाइन मुख्याध्यापक शिक्षक गुणगौरव सोहळया प्रसंगी कोकण विभागातील ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे ,एकात्मिक महिला बालविकास विभागाचे अधिकारी संतोष भोसले, पंचायत समिती अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी अशिष मनोहर झुंजारराव, केंद्रप्रमुख पाटील मॅडम, पवार मॅडम ,चिखलोली , भाल केंद्रातील मुख्याध्यापक , सर्व आदरणीय गुरुमाऊली,जीवन गौरव मासिकाचे संपादक रामदास वाघमारे , संपादक,मीरा वाघमारे उपसंपादक, ठाणे जिल्हा सहसंपादक मोहीनी बागुल यांच्या संकल्पनेतून आँनलाईन पुरस्कार वितरण करण्यात आले. सुंदर आँनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन खालील मुख्याध्यापक शिक्षक यांना शिक्षक दिनानिमित्ताने गौरविण्यात आले. या मध्ये नाविन्यपूर्ण मुख्याध्यापक रोहिदास मदन चव्हाण,रमेश चींधू परदेशी,प्रमोद हेमा पाटील, नाविन्यपूर्ण शिक्षक मोहिनी पंडित बागुल,मनीषा आनंद वसईकर, उमा महेश घोलेकर ,योगिता अरविंद मिसर,आरती अनिल नागभिडकर , इत्यादी मुख्याध्यापक शिक्षक यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आँनलाईन सुत्रसंचलन वसईकर मॅडम ,मोहीनी बागुल मॅडम यांनी केले , सहकार्य शिक्षक वृंद वसार, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, दिलीप फुलोरे वसार सोबत रोहिणी पाटील मॅडम तर आभार व परीक्षण केंद्रप्रमुख सरिता पाटील यांनी केले.

- Advertisement -