पातोंडाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा !
चाळीसगाव (प्रतिनिधी)- पातोंडा येथील सुरेश यशवंत सोनवणे हे पातोंडेकर {मुख्या.जि.प शाळा भोलाणे ता.पारोळा} यांचे सुपुत्र चिरंजीव विवेक सुरेशराव सोनवणे यांचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून राज्य करनिरीक्षक पदी यथोचित निवड झाली त्याबद्दल त्यांचा विविध शिक्षक संघटना पदाधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्या राहत्या घरी अभिनंदन व सत्कार केला . तसेच गावकरी ग्रामस्थ विविध स्थारातुन त्यांचे कौतिक करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
त्यांना पुढील वाटचालीसाठी अखिल मराठा समाज सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश पाटील , उपाध्यक्ष नितीन पाटील , सचिव संजय पाटील , कार्याध्यक्ष धनराज पाटील व सर्व संचालक सदस्य यांच्याकडूनही शुभेच्छा !