अमळनेर शहरात गर्दी करून अंतराचे नियम मोडणाऱ्या चार दुकानदारांवर सील करून गुन्हे दाखल तर एक पेट्रोलपंपही सील !

0 8

अमळनेर शहरात गर्दी करून अंतराचे नियम मोडणाऱ्या चार दुकानदारांवर सील करून गुन्हे दाखल तर एक पेट्रोलपंपही सील
प्रतिनिधी अमळनेर :
व्यवसायिकांना वारंवार सूचना देऊनही गर्दी कायम असून सामाजिक अंतराचे नियम देखील पाळले जात नसल्याने तोंडी आदेशाने एक पेट्रोल पम्प सील केला आहे तर चार दुकानदारांवर गुन्हे दाखल करून पुढील आदेशापर्यंत दुकाने सील केल्याची माहिती प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी दिली
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी कोरोना च्या पार्शवभूमीवर 31 रोजी सकाळी साडे दहा वाजता शहरात गर्दी नियंत्रणाबाबत भेटी दिल्या असता त्यांना गुळबाजारातील कैलास ट्रेडिंग कंपनी , मसाला बाजारपेठेतील अमूलमल सुगणामल किराणा दुकान , बाजार पेठेतील शंकर किराणा व विजय मेडिकल स्टोअर्स या दुकानांवर गर्दी आढळून आली व ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवलेले नव्हते म्हणून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी नायब तहसीलदार राजेंद्र शंकर चौधरी यांना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले चौधरी यांनी, चारही दुकानदारांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा चे पालन केले नाही अशी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून चारही दुकानदारांविरुद्ध कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुनील हटकर करीत आहेत त्याचप्रमाणे पुढील आदेशापर्यंत दुकाने सिल करण्यात यावेत असेही प्रांताधिकाऱ्यानी आदेश दिले आहेत तर शहरातील प्रमुख पेट्रोल पंपावर गर्दी होती व नियम पाळले जात नव्हते तसेच वेळ संपल्यानन्तरही पेट्रोल विक्री सुरू असल्याने तोंडी आदेशाने पंप पुढील आदेशापर्यंत सील केल्याचेही प्रांत सीमा अहिरे यांनी सांगितले

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.