अमळनेरात संत गाडगेबाबा जयंती उत्सवात साजरी !

0 277

अमळनेरात संत गाडगेबाबा जयंती उत्सवात साजरी

अमळनेर प्रतिनिधी : देव दगडात नसुन तो माणसांमध्ये आहे अशी शिकवण देणारे थोर संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून युवा परिटधोबी मंडळ अमळनेर च्या वतीने भव्य शोभायात्राआयोजित करण्यात आली होती संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन संत सखाराम महाराज संस्थांनाचे गादीपती हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करून मिरवणूकीची सुरुवात झाली
तत्पूर्वी वाडीचौक जुनी चावडी दगडी दरवाजा गाडगेबाबा चौक गाडगेबाबा उद्याना पर्यंत रस्ता स्वच्छ करून दिपक वाल्हे सर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभित रागोळ्या काढल्या त्यांना रवींद्र जाधव गणेश नेरकर ज्ञानेश्वर जाधव अनिल मांडोळे अनिल वाघ यांचेसहकार्य लाभले

मिरवणुकीच्या अग्रभागी लहान मोठ्या बालिकांनी मराठमोळ्या वेशभूषा करून केशरी रंगाचे फेटा परिधान केले होते
जुनी चावडी परिसरात बबलू जाधव व आकाश जाधव मिञ परिवार च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले
संतगाडगेबाबा चौकात प्रा डॉ रमेश माने सुरेश चंद्र येशी उमेश वाल्हे विनोद जाधव भरत जावदेकर संतगाडगेबाबा च्या स्मारक पूजन माल्यार्पण व साप्ताहिक लढाऊ लेखणी पेपराचे प्रकाशन करण्यात आले लढाऊ लेखणी चे अमळनेर प्रतिनिधी दिपक वाल्हे यांनी कार्यक्रमिचे सुत्रसंचालन केले
संतगाडगेबाबा उद्यानात मिरवणूकीत सहभागी महिला वर्गाच्या हस्ते पूजन आरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अमुत जाधव विजय वाघ सर गोरख चित्ते मोतीलाल जाधव जगतराव निकुंभ सर सतिष पवार मधुकर निंबाळकर अविनाश जाधव गुलाबराव जाधव सर परशुराम महाले आरुण जाधव गंगाराम वाल्हे अनिल वाल्हे सर एस टि सुर्यवंशी योगेश शिंदे भास्कर वाल्हे आदी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.