प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे -जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

0 20

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे -जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, (जिमाका) दि. 5:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ विहित वेळेतच दिला जाईल, याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.


प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. तडवी, डॉ. प्रकाश नंदापूरकर, डॉ. रायलानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, या योजनेतंर्गत ज्या ज्या टप्प्यावर लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्या टप्पयावरच लाभार्थ्यांना अनुदान मिळाले पाहिजे, त्यामध्ये कसून होता कामा नये. यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करुन लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात रक्कम जमा होईल याची दक्षता होईल. कोणत्याही लाभार्थ्याची अडवणूक होणार नाही. यावरही सर्व संबंधित अधिकारी यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 37 हजार 326, नगरपालिका हद्दीतील 7 हजार 217 तर जळगाव शहर महानगरपालिका हद्दतील 4 हजार 624 असा एकूण 49 हजार 167 लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या टप्प्यांवर प्रति लाभार्थी पाच हजार रुपये याप्रमाणे लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पाटोडे यांनी बैठकीत दिली.
यावेळी विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम, राष्ट्रीय जंतनाशक दिन, टीबी फोरम आदि योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.