भडगावात मास्टरलाईनच्या ‘ गुड टच बॅड टच ‘ ऊपक्रमास ऊत्फुर्त प्रतीसाद…….

0 28

भडगावात मास्टरलाईनच्या ‘ गुड टच बॅड टच ‘ ऊपक्रमास ऊत्फुर्त प्रतीसाद…….

भडगाव – मास्टरलाईन फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर जैन यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत भडगाव शहरातील महाविद्यालय , माध्यमीक शाळा , प्राथमिक शाळा , ईंग्लीश मेडीयम स्कुल शाळांमध्ये औरंगाबाद येथील शाय फाऊंडेशनच्या सौ. रेशम बंब यांनी शालेय विद्यार्थांसाठी ‘ गुड टच बॅड टच ‘ कार्यक्रम सादर केला .

समाजात अत्यंत संवेदनशील समजले जाणारे बाल लैंगीक शोषण या विकृतीला कश्याप्रकारे सामोरे जायचे , आपल्यावर असा प्रसंग आल्यास काय करायचे या विषयी सर्वीस्तर मार्गदर्शन केले . अश्याप्रकारच्या दहा पैकी नऊ घटना या परिचीत व्यक्ती , जवळ्चे नातेवाईक , शेजारीपाजारी यांच्याकडुनच होत असतात त्यामुळे त्यामुळे चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ओळखतां येण आवश्यक झाले आहे. मुख्य म्हणजे आपल्या शरिराचे 4 मुख्य प्रायवेट पार्ट म्हणजे ओठ , छाती , दोन्ही पायांमधील भाग , यांना कोणी चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्यास त्या व्यक्तीला जोरात ओरडुन नाही म्हणने व त्या व्यक्तीपासुन लगेच दुर जावुन आपल्या पालकांना / शिक्षकांना याविषयी माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले . यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्यासोबत मुक्तपणे संवाद साधला . या कार्यक्रमानंतर सुध्दा सतत या विषयावर विशेष करुन महिला शिक्षकांनी सतत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सौ रेशम बंब यांनी यावेळी नमुद केले .

हा ऊपक्रमात शहरातील सौ र. ना. देशमुख महाविद्यालय , लाडकुबाई माध्यमीक विद्यालय , आदर्श कन्या विद्यालय , कै पुनम पवार माध्यमीक विद्यालय , वाय एम खान माध्यमीक विद्यालय , अॅंग्लो उर्दु माध्यमीक विद्यालय , लाडकुबाई प्राथमिक विद्या मंदीर , न्यु ईंग्लीश मेडीयम स्कुल , समर्थ प्रोग्रेसीव ईंग्लीश मेडीयम स्कुल , साई समर्थ इंटरनॅशनल ईंग्लीश मेडीयम स्कुल , साई समर्थ ITI , जि प उर्दु शाळा जामा मस्जीद , जि प उर्दु शाळा यशवंतनगर , न्यु चेतना ईंग्लीश मेडीयम स्कुल आदि शाळांनी सहभाग नोंदवला . ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे संस्थाचालक , मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य मिळाले.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.