धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी घरकुल योजना राबविण्यास मान्यता

0 18

धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी घरकुल योजना राबविण्यास मान्यता
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी घरे बांधण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. तसेच धनगर समाजाच्या लोकांसाठी दहा हजार घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आर्थिक वर्षात 150 कोटी एवढ्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण्या मुक्त वसाहत योजनेसाठी वैयक्तिक घरकुलासाठी असलेले निर्णय, अटी, शर्ती या योजनेसाठी लागू राहणार आहे. लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीस राहणार आहे. ही योजना ग्रामविकास विभागाच्या गृहनिर्माण कक्षामार्फत राबविली जाणार असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.