विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत कला क्षेत्राचा अभ्यास करावा – डॉ.आरती चौधरी !

0 1,034

विद्यानिकेतन महिला महाविद्यालयात स्नेसंमेलनाचे थाटात  समापन !

विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबत कला क्षेत्राचा अभ्यास करावा – डॉ.आरती चौधरी आर्वी – स्थानिक स्वामी समर्थ महिला ग्रामीण विकास संस्था वर्धा व वीसडम पब्लिक स्कूल, आर्वी च्या संयुक्त विद्यमाने भव्य स्नेह संमेलन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ महिला ग्रा.शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. आरती मंगेश चौधरी होत्या. तर उद्धघाटन पत्रकार तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त श्री राजेश  अहिव यांनी केले, प्रमुख अथिती म्हणून स्वामी समर्थ म.ग्रा. वि.संस्था च्या अध्यक्षा सविता ताई चौधरी, उपाध्यक्षा मालतीताई राऊत, रामदासजी राऊत, दृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मंगेशजी चौधरी, प्रभाकरराव चौधरी, श्री शक्ती भाऊ गोरे प्राचार्य कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आष्टी, मा.प्रा जयश्रीताई गायकवाड, श्री संत महाविद्यालय वर्धा, प्राचार्य श्री मनोज राऊत सर, यांची उपस्थिती होती. याप्रसंगी  उद्घघाटक श्री.राजेश अहिव यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ.आरती चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देतांना श्री अहीव म्हणाले की संस्थेचे युवा सचिव मंगेश चौधरी यांनी महिलां करिता विशेष कॉलेज उघडून शिक्षणाकरिता संधी उपलब्ध केल्या बद्दल अभिनंदन व आभार मानले स्नेसंमेलनाचे माध्यमातून  अभिनय क्षेत्रातही आपले करियर सार्थ करावे असे आव्हाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कला व व्यावसायिक क्षेत्राचा अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले प्राचार्य शक्ती भाऊ गोरे यांनीही यथोचीत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 5 दिवसात घेतलेल्या विविध  स्पर्धा त्यात संगीत खुर्ची, चम्मच गोटी , वेश भूषा, फॅशन शो व इतर स्पर्धांचे आयोजन प्रा.केला मॅडम, उजमा मॅडम, पुरोहित मॅडम, करपे मॅडम, गुडधे मॅडम, देशमुख, डाफ  देशमुख, सरोदे, कहाते, इत्यादी मॅडम यांनी केले. विविध स्पर्धेचे,नृत्य संचालन  कु.यशिका मुलचांदानी,तुबा शेख, कु. प्रतीक्षा तीलावाट ,कु.खुशी लालवानीयांनी केले. 2018 2019 मध्ये शिक्षण बोर्डाच्या वर्ग 12 वी ( इंग्रजी माध्यम) वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी कु.ऋतीका संजय घोटकर आर्वी तालुक्यातून प्रथम आल्याने तिचा मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. संस्थेच्या  यशस्वी वाटचालीस मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.प्रवीण मडघे सर यांनी तर  संचालन प्रा.तोशिक पठाण यांनी केले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री.प्रा. गावंडे मॅडम, प्रा.माजुरकर, प्रा. चरडे मॅडम, प्रा.चिरडे मॅडम, प्रा.नाखले मॅडम यांनी तर शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वश्री. लक्ष्मीकांत दाते, विशाल पोहेकर, शुभम दांडगे, प्रमोद देशमुख, सौ.काळपांडे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.अर्चना गुळभेले यांनी मानले. सर्व विद्यार्थी व मान्यवरांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला .

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.