आनंद मेळाव्यामुळे विदयार्थ्याना व्यवसायाचे ज्ञान मिळते ! प्रकाश महाजन .

0 824

आनंद मेळाव्यामुळे विदयार्थ्याना व्यवसायाचे ज्ञान मिळते ! प्रकाश महाजन
पारोळा (वार्ताहर/प्रतिनिधी) विदयार्थी दशेत केवळ अभ्यासच महत्वाचा नसुन विविध कला विदयार्थ्यानी आत्मसात केल्या पाहिजे त्यामुळे विदयार्थी हा कलेच्या माध्यमातून प्रत्येक संकटावर मात करु शकतो. संकटाच्या वेळी आर्थिक मदत विविध कलेच्या माध्यमातून होत असते. शिवाय विदयार्थ्याना अशा विविध उपक्रमातुन व्यवहाराचे ज्ञान मिळते असे प्रतिपादन डॉ. हेडगेवार शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित श्री स्वामी समर्थ माध्यमिक विदयालयात आयोजित आनंद मेळाव्या वेळी प्रकाश महाजन यांनी केले.


विदयार्थ्याच्या सर्वागिन विकासासाठी विदयालय नेहमी प्रयत़्ननशिल असते. विदयालयात दरवर्षी विविध उपक्रमादवारे विदयार्थ्याच्या कला गुणांना वाव दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पाककले मध्ये विदयार्थी पारंगत व्हावे हा मानस विदयालयाचा असतो. शहरी विदयार्थ्याप्रमाणेच ग्रामीण भागातील विदयार्थी सुध्दा प्रत्येक गोष्टीत सरस आहेत. त्यांचा प्रत़्णयेय विदयार्थ्यानी दिला.
दि. 17 जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विदलयात आनंद मेळावा उत्साहात संपऩ्षन झाला. मेळाव्याचे उदघाटन विदयालयाचे कलाशिक्षक प्रकाश महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विदलयाचे मुख्याध्यापक गोविंद टोळकर उपस्थित होते.
मेळाव्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख सौ. भारती प्रविण पाटील यांनी प्रस्तावतेत आनंद मेळाव्याचा मुख़्िय उददेश सांगितला. मेळाव्यामुळे विदयार्थ्याना व्यवहारीक ज्ञान कसे वाढते या बाबत सांगितले . आनंद मेळाव्यात विदयालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विदयार्थी-विदयार्थीनी सहभाग घेतला त्यात सरीता पाटील, आविश्वनी पाटील, प्रियंका पाटील, पल्लवी पाटील, पूजा निकम, सोनाली नेतकर, नेहा पाटील, दिशा माळी, सिध्दी पाटील, मिनल सोनार, दिपाली भिल, जयश्री भिल, प्रशांत महाले, अविनाश पाटील, दुर्गा निकम, भाग्यश्री बिऱ्हाडे, हेमांगी पाटील, निकिता पवार, भाविका पाटील, दिव्या पाटील, साक्षि पाटील, पुनम न्हावी, वैष्णवी पाटील, संजना बिऱ्हाडे, गायत्री पाटील, लक्ष्मी पाटील.तसेच त्यांनी आपल्या पाक कृतीत गुलाबजामुन, पाणीपुरी, आलुपुरी, विविध प्रकारचे ज्युस, इंडली-डोसा, गाजर हलवा, चिल्ली, पावभाजी, कचोरी, सॅडविज, भेल, पेटीस, पॉपकॉन, वेफर्स स्वत: तयार करुन मेळाव्यात स्वत:चा स्टॉल विविध कलाकृतीत तयार करुन खादयपदार्थ विक्रीस सादर केले. आनंद मेळाव्यात विदयालयातील विदयार्थ्यानी स़्ावत: पाककलेचे स्टॉल लावलेले होते. मान्यवरांनी विदयार्थ्यानी बनविलेल्या पदार्थाचा आस्वाद घेवून कौतुकाची शाबासकी दिली.
विदयालयाचे मुख्याध्याक गोविंद टोळकर यांनी विदयार्थ्याचे कौतुक केले व असे कार्यक्रम विदयार्थ्याचा सर्वागीण विकासाला कारणीभूत ठरतात असे सांगितले. विदयार्थ्यानी केलेल्या विविध पाककृतीला कार्यक्रमाचे आयोजक यांनी सलाम केला. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी व विविध पाककृती निरीक्षणात यशस्वती ठरल्याबददल विदयार्थी –विदयार्थीनी यांचे आभार मुख्याध्यापक गोविंद टोळकर यांनी मानले.
पाककृतीला कार्यक्रमाचे आयोजक यांनी सलाम केला. कार्यक्रम यशस्वतीतेसाठी व विविध पाककृती निरीक्षणात यशस्वती ठरल्याबददल विदयार्थी –विदयार्थीनी यांचे आभार मुख्याध्यापक गोविंद टोळकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वतीतेसाठी विदलयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.