नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या तू तू – मै मै ला पूर्णविराम, मुख्याधिकारी दरेकर यांची बदली

0 92

प्रतिनिधी – योगेश डोखे कोपरगाव

नगराध्यक्ष विजय वहाडने याना कोपरगावच्या जनतेने विश्वास दाखवून नगरपालिका निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिले . मात्र कोपरगाव नगरपालिकेत रखडलेल्या विकासकामांमुळे जनतेचा भ्रमनिरास होताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष वहाडने व मुख्याधिकारी दरेकर यांची तू तू – मै मै पहावयास मिळत होती. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या आडमुठे धोरणामुळे कोपरगावचे प्रश्न रखडले असल्याचा आरोप नगराध्यक्ष वहाडने यांनी बऱ्याचदा केला होता मात्र आता मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांची बदली होऊन कोपरगावला नवीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे रुजू होणार आहे. आता तरी कोपरगावचा विकास होईल का असा प्रश्न सर्वसमान्यांपुढे उभा राहिला आहे.

कोपरगाव नगरपालिका म्हंटली आंदोलने, मोर्चे , तेच तेच वारंवार उद्भवणारे पाण्याचे , कचऱ्याचे, गटारीचे व रस्त्याचे प्रश्न या प्रश्नावर नगरपालिकेत सतत आंदोलने , मोर्चे , निवेदने देण्यासाठी नागरिकांची वर्दळ , एकीकडे प्रश्न सुटत नसल्यामुळे वैतागलेले नागरिक व दुसरीकडे सुस्तावलेल्या नगरपालिकेतील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे श्रेयवादासाठी तसेच जबाबदारी झटकण्यासाठीचे आरोप प्रत्यारोप या मुळे कोपरंगावच्या नागरिकांबरोबर नगरपालिकेतील कर्मचार्यांवरही याचा प्रभाव दिसून आला होता. या दोघांच्या आडमुठे धोरणामुळे नगरपालिकेत कर्मचार्यांबरोबर कोपरगावची जनता भरडली जात होती.
गेल्या आठवड्यात नगरपालिकेत डॉक्टरांचा गोट्यांचा डाव खेळून निषेध, प्रभागातील कामे होत नसल्याने नगरसेवकाने डोक्यात खुर्ची मारली ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा न धुतल्याने मनसेचे ठिय्या आंदोलन , सर्वसाधारण सभा घ्यावी म्हणून राष्ट्रवादीचे निवेदन ,मनाई येथील अधिकृत कत्तलखाना सुरु करण्यासाठी मोर्चा, पाणी प्रश्नावर महिलांचे ठिय्या आंदोलन असे अनेक निवेदने, मोर्चे, आंदोलने मागील आठवड्यात पहावयास मिळाली. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या असमन्वयामुळे नगराध्यक्ष आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवतात व मुख्याधिकारी यातील तांत्रिक बाबी व त्यातील अडथळे नागरिकांना सांगतात मात्र आजपर्यंत दोघांनी एकत्र बसून समोरच्या आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नाला तोंड दिलेले कधी दिसले नाही. हे दोघे शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र बसले नाही , एकमेकाकडे जाण्यास ते कमीपणा मानत असल्याचे चित्र होते. त्यांच्या या धोरणामुळे आंदोलनकर्त्यां नागरिकांना मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसे. विश्वास ठेवल्याचा तर कोणावर हा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहत होता. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या तू तू – मैं मैं ला कोपरगावची जनता अक्षरशः वैतागली होती. मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच त्यांच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेल्या नरेंद्र मोदी विचारमंचच्या वतीने यांच्या बदलीची मागणी केली होती.

आज सकाळी कळाले कि मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांची बदली होऊन त्यांच्या जागी वरनगाव नगरपरिषद जळगाव येथील मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे रुजू होणार आहेत त्या बाबत नरेंद्र मोदी विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकून नगराध्यक्ष याना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मात्र आता तरी नवीन मुख्याधिकारी रुजू झाल्यावर कोपरगाव शहराचे प्रश्न सुटण्यास मदत होईल का हा प्रश्न जनसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण मुख्याधिकारी कोणीही असो तो मात्र नियमबाह्य काम करू शकत नाही . कोपरगाव नगरपालिकेतील बरेच प्रश्न हे कायद्याच्या कचाट्यात अडकून पडले आहे .

मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी आपल्या कारकिर्दीत स्वच्छ भारत अभियान शहरात उत्कृष्ट पद्धतीने राबवून कचरा मुक्त शहर केले व ज्या ठिकाणी उकिरर्डे होते त्या ठिकाणी बागा फुलविल्या, विविध ठिकाणी गार्डन बनविले, तसेच हागणदारी मुक्त शहर बनवून नगरपालिकेला बक्षीसही मिळवून दिले. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन वेळो वेळी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते.

आज कोपरगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या रुपाने नवीन मुख्याधिकारी भेटणार आहेत. नेहमी मुख्याधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे कोपरगावचे प्रश्न प्रलंबित आहे असे सांगणारे नगराध्यक्ष विजय वहाडने , यांचा आता नूतन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याशी समविचार होईल का ? कोपरगाव विकासाच्या लोकल पॅसेंजरचे आता एक्स्प्रेस मध्ये रूपांतर होऊन शहराचा कायापालट होण्यास मदत होणार का ? हे मात्र येणारचा काळच सांगू शकेल.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.