अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत … स्वाभिमानी शेतकरी संघटना तर्फे तहसीलदारांना निवेदन…

0 417

अमळनेर :- स्वाभिमानी शेतकरी संघटना, अमळनेर व रणायचे विकास मंच यांच्यातर्फे तहसीलदार यांना अतिवृष्टीने झालेल्या शेतीचे व पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत निवेदन देण्यात आले.          

        परतीच्या पावसाने शेतातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कुठल्याही जाचक अटी न लावता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच पीक विमा तात्काळ मंजूर करून शेतकर्‍यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर बँक खात्यावर जमा करावे अशी विनंती शेतकरी बांधवांतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तात्काळ मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.