शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचा आमदार अभिनंदन उपक्रम. राज्यातील निवडून आलेल्या सर्वच आमदारांचे त्यांचेकडे जाऊन करणार स्वागत.

0 1,075

शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचा आमदार अभिनंदन उपक्रम.
राज्यातील निवडून आलेल्या सर्वच आमदारांचे त्यांचेकडे जाऊन करणार स्वागत.


जळगाव देि 29 राज्याच्या शाश्वत विकास सह शैक्षणिक सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात समन्वयाने सहकार्याचा निकोप भावनेतून सेतू बांधायचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातून 28रोजी सुरू करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आटोपले असून सत्तास्थापनेचे वारे राज्यात वाहत असताना महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह दिनांक 28 ऑक्‍टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे जाऊन नामदार गुलाबराव पाटील यांची राज्य समन्वय समितीच्या वतीने त्यांना शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे विधिमंडळातील सर्व 288 आमदारांच्या स्वागत व अभिनंदनाच्या संदर्भात एका राज्यव्यापी स्वागत अभिनंदन मोहिमेचा शुभारंभ याप्रसंगी करून चांगला पायंडा त्यांनी सुरू केला.सर्वजण निवडून आलेल्या आमदारांचे स्वागत करत असतात परंतु सातत्याने नावीन्यपूर्ण करण्याची व समाजव्यवस्थेला बळकट करण्याची कृती करणारे किशोर पाटील कुंझरकर एवढ्यावरच थांबतील कसे त्यांनी पाळधी येथूनच राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून राज्यातील सर्वच आमदारांचे राज्य समन्वय समितीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ सुरू करीत असूनआपण आपल्या स्तरावरून राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आपल्या भागातील आमदारांचे स्वागत करण्याच्या सूचना निर्गमित करण्याचे संदर्भात साकडे घातले असताना त्यांनी आपल्या लाडक्या व प्रामाणिकपणे शिक्षक हितासाठी व सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे स्तुत्य असल्याचे सांगून राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची त्या-त्या भागातील पदाधिकारी मार्फत राज्य समन्वय समितीच्या वतीने स्वागताची मोहीम सुरू करण्यात आली असून पाळधी येथून शुभारंभ झाल्याचे जाहीर केले .राज्य समन्वय समितीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडावे यां निकोप भावनेतून सर्वसमावेशक दृष्टीने सातत्याने परिश्रम घेत प्रयत्न करणारे किशोर पाटील कुंझरकर एक अभ्यासू पदाधिकारी असून राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक या नात्याने त्यांनी एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात स्वागत करण्याचा राज्यव्यापीमोहिमेचा शुभारंभ केल्याबद्दल राज्याध्यक्ष अर्जुन साळवे यांनी कुंझरकर यांच्या धडपडी बद्दल गौरवोद्गार काढले . सर्व आमदारांचे विधिमंडळात पाच वर्षासाठी त्यांचे पदार्पण झाल्याकारणाने स्वागत करण्याचा राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातील आमदारांच्या स्वागत अभिनंदनमोहिमेचा शुभारंभ राज्य समन्वय किशोर पाटील कुंझरकर यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्ह्यातील पाळधी तालुका धरणगाव येथून देि 28 ऑक्टोबर 2019 सोमवार रोजी दुपारी चार वाजता पासूनसुरू होत असल्याचे म्हटले. राज्य समन्वय समितीच्यावतीने सर्व कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ भागातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या निवडून आलेले आमदारांचे शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान अभिनंदन करण्याचे यावेळी आयोजित करण्यात आले.
तसेच राज्य समन्वय समितीच्या वतीने लवकरच कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार व मंत्री यांचा सन्मानाचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
राज्याच्या शाश्वत विकासासाठी खिलाडूवृत्तीने सर्वांनी एकत्रित येऊन एका फोरम खाली येऊन समन्वय साधावा हा त्यामागचा हेतू व मानसअसल्याचा शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. पाळधी तालुका धरणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नामदार गुलाबराव पाटील यांचा राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विधानसभेत नव्याने निवडून आल्याबद्दल स्वागत सत्कारव अभिनंदन करण्यात येऊन राज्य आमदार अभिनंदन मोहिमेचा शुभारंभ दिनांक 28 रोजी दुपारी चार वाजता करण्यात आला.
राज्यातील शिक्षकांचे व सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे नामदार पाटील यांनी यावेळी म्हटले.
यावेळी राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे समवेतपदवीधर महासंघाचे राज्याध्यक्ष गिरीश वाणी ,पारोळ्यातील गुणवंतराव पाटील, व अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
राज्य समन्वय समितीचे पदाधिकारी उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष ईल्ला जूउद्दीन फारूकी, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्ष प्रतिभाताई भराडे राजेंद्रजी आंधळे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राजेंद्र म्हसदे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, आदीसह नामदार गिरीश महाजन यांनी संघटनेच्या वतीने राज्य समन्वय समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन केले .

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.