85 शेतकऱ्यांच्या शेतकरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले !

0 19

अमळनेर  – तालुक्यातील 85 शेतकऱ्यांच्या शेतकरी भूषण पुरस्कार देऊन दिनांक 14 रोजी बाजार समिती आवारात गौरविण्यात आले यावेळी बाजार समितीतील नूतन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. वनश्री कृषीभूषण साहेबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता कृषिभूषण तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील ,सहकार व पणन विभागाचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर गणेश शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प स सभापती वजा बाई भिल, माजी उपसभापती श्याम अहिरे, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, प्रगतशील शेतकरी रामभाऊ संदांनशिव, पंडित बळीराम पाटील ,सरपंच दिलीप सिंग राजपूत ,सी डी महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे तसेच मार्केट चे सभापती प्रफुल पवार, प्रभारी सभापती पराग पाटील ,जि प सदस्या मीनाबाई पाटील, संगीता भील, प स सदस्या रेखा पाटील, विनोद पाटील ,नगरसेवक सुरेश पाटील, भाजप शहराध्यक्ष शितल देशमुख, दिलीप ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी करताना जागर नव सरकारच्या या अंतर्गत हा कार्यक्रम असून प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम असे 85 आदर्श शेतकऱ्यांची निवड अमळनेर पारोळा तालुक्यातून केली आहे आमच्या 10 लोकांकडे यांची जबाबदारी होती ती प्रामाणिकपणे पार पाडली असे असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना आकर्षक विठ्ठल मूर्ती व रुमाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सहकार व पणन महामंडळाचे ब्रँड अँबेसिडर गणेश शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना तंत्रज्ञान शिकायला हवे .आता पुढची पिढीही सोशल मीडियावर ही आपले मार्केटिंग करू शकते. शेतकऱ्यांनो तुम्हाला तुमची व्हॅल्यू क्रिएट करावी लागेल ,बाह्य कोल्ड्रिंक्स प्रमाणे आपण निंबुपाणी आणि लसीचे मार्केटिंग करू शकलो नाही शेतकरीला बदलायचे असेल तर जादूच्या कांडीच्या विश्वासावर राहून नका. शासन फक्त पोषक वातावरण निर्माण करेल पण खरे कौशल्य शेतकऱ्यांनाच दाखवावा लागेल आपणच आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहात. मुलांना मोठे स्वप्न दाखवा असे शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी भूषण सन्मान सोहळ्यात संबोधित केले .

पुढे बोलताना गणेश शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या उत्पन्नाची नव्हे विकण्याची आहे पीकविता आले तसे विकताही आले पाहिजे शेती हा जगातला उत्तम व्यवसाय असून एक दाणा पेरला त्यातून हजार दाणा उत्पन्न आहे तरीही शेतकरी तोट्यात का याचा विचार करण्याची गरज असून यासाठी प्रत्येक शेतकरी व्यवसायिक होणे आवश्यक आहे दहा किंवा वीस शेतकऱ्यांनी किंवा दोन ते तीन गावांनी एकत्र येऊन प्रोसेसिंग प्लांट टाकावा यामुळे बाजारपेठेत उपलब्ध होईल हिम्मत बाजारात विकत मिळत नाही ती दाखवावी लागते माती देखील बाजारात विकता येते केवळ कौशल्य पाहिजे असे आवाहन त्यांनी केले

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वप्न असून धरण करण्यासाठी त्यांनी पंधराशे कोटी निधी मंजूर करून आपलं वक्तव्य खरे ठरवले असल्याची भावना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली पुढे बोलताना म्हणाले की माझ्या शेतकरी कष्टाळू व स्वाभिमानी आहे शेतकऱ्यांच्या मालाच प्रोसेसिंग सिंचनाची टक्केवारी वाढवण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केला आहे 16 वरून 22 टक्के सिंचन राज्यात वाढला आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती ने घेतला हे अभिमानास्पद आहेत्यांना शेतकऱ्यांची जाण असल्याने हा गौरव केला आहे मुबलक पाणी, चोवीस तास वीज या दिशेने सरकारची वाटचाल असून येणाऱ्या काळात बाहेर देशातील फुड प्रोसेसिंग च्या इंडस्ट्री देशात येणार आहे त्यावेळी शेतकरी च्या मालास योग्य भाव मिळेल येणाऱ्या काळात हे चित्र नक्कीच दिसेल आमदार स्मिताताई आमच्या भगिनी असून त्यांच्या या भागासाठी कार्य उत्तम आहे त्या निश्चितच अजून काही चांगलं करतील अशी भावना त्यांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

आपण विकासाचे राजकारण करून एकत्र आले पाहिजे आमदार स्मिता वाघ

आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की बाजार समितीच्या आगळावेगळा हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे काहीजण जातीपातीचे राजकारण करत आहे पण आपण विकासाचे राजकारण करून एकत्र आले पाहिजे पूर्वीच्या जेष्ठ नेत्यांनी या तालुक्याला चांगली दिशा दिली आहे पण आता जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे गिरीश भाऊंनी धरण प्रश्न मार्गी लावला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ती केली आहे बाजार समितीचे कामही कौतुकास्पद आहे या मार्केटने आयएसओ मानांकन मिळवले असून आवक चांगली आहे कपिलेश्वर च्या संरक्षण भिंतीच्या जीआर आमदार स्मिता वाघ यांच्या नावाने आहे तरी ते श्रेय घेता त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

 सूत्रसंचालन हिरालाल पाटील यांनी केले.व्यासपीठावर बाजार समितीचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव डॉ उमेश राठोड सहसचिव सुनील शिसोदे ,यासह कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.