पिंपळे येथे एक गाव एक गणपती निमित्त चालता बोलता कार्यक्रम संपन्न

0 36

पिंपळे येथे एक गाव एक गणपती निमित्त चालता बोलता कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे एकगाव एक गणपतीच्या याठिकाणी नुकताच चालता बोलता कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने गणपती आरतीचे मानकरी अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व शरद पाटील हे उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गणपती बाप्पा विषयी मोलाचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले. यावेळी चालता बोलता कार्यक्रम सादर करताना उमेश काटे, विजय पवार यांनी विविध सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेतला.त्यांच्यावतीने
व ओम साई क्लासेस यांच्यातर्फे झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन यावेळी करण्यात आले. चालता बोलता कार्यक्रमात तीन प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसे देण्यात आली मोठ्या प्रमाणात महिलांना बक्षीस देण्यात आले
यावेळी दहावीत प्रथम आलेले कुणाल गुलाब पाटील , द्वितीय – कुणाल दिलीप चौधरी , तृतीय – यशोदीप जयवंतराव पाटील या विद्यार्थिनींचा रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. लष्करातील जवान प्रमोद निंबा पाटील (एसएसबी), हेमंत भटू पाटील (सी आय एस एफ), जितेंद्र संभाजी पाटील (आर पी एफ) यांचा यावेळी ग्रामस्थांतर्फे गौरव करत सत्कार करण्यात आला. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य , नाट्य , सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलीत. दिपाली पाटील व पूजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


अविनाश पाटील आदर्श विद्यालय धुळे, यावेळी संजय पुनाजी पाटील शेतकी संघ प्रेसिडेंट, तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी, माजी उप सरपंच जीवन उत्तम पाटील , पोलीस पाटील
राजेंद्र माणिक पाटील , माजी विकास सो सा सदस्य साहेबराव गबा पाटील, गणेश मोतीराम पाटील, युवराज पाटील, भटू दौलत पाटील, जयंतराव दगा पाटील, पुरूषोत्तम लोटन चौधरी व ग्रामपंचायत सरपंच दिनेश पाटील वंदना गणेश पाटील सदस्य कविता बाळु पाटिल सदस्य, ज्ञानेश्वर दिलीप पाटील, सर्व सदस्य व ग्रामीण महिला , ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.