Home पाचोरा मोहरम व गणेश उत्सव निमित्त भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमेटी ची बैठक संपन्न !

मोहरम व गणेश उत्सव निमित्त भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमेटी ची बैठक संपन्न !

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने मोहरम व गणेश उत्सव  निमित्त शांतता कमेटी ची बैठक अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
भडगांव बाळद रोड डोकरे हाॅल मध्ये शांतता कमेटी बैठक संपन्न झाली यावेळी सुत्रसंचालन नितीन महाजन यांनी केले. व प्रास्ताविक पो.नि.धनंजय येरूळे यांनी भडगांव हे सर्वधर्म व शांतीप्रिय गांव असल्याचा निर्वाळा दिला असून माजी डि.वाय.एस.पी.वंजारी साहेब यांनी खाकीमधील पोलिसाची व्याख्या सांगीतली. महावितरण चे अधिकारी दामोरे  यांनी आपली अडचण सर्व लोकांना सांगुन विजवितरण विभागाला सहकार्य करावे असे नमुद केले. शिवसेना जिल्हा अध्यक्ष इम्रान अली सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी पोलिसांसाठी एक नविन पर्यायी जागा करून दिल्यास पोलिसांनाही काम करण्यासाठी सोपे होईल असे मत व्यक्त केले. समीर जेन यांनी सी.सी. टीव्ही बाबत माहिती दिली जेणे करून गुन्हे होणार नाही व भडगांव शहर सुव्यवस्थेस मदत होईल,कोणत्या ही अनुचीत प्रकार होणार नाही असे मत त्यानी व्यक्त केले. (हिंदू मुस्लिम बुद्ध सिख इसाई पाच ही धर्म एकमेकांना एकत्रित ठेवण्यात आले पाहिजे)  अध्यक्षीय भाषणात सचिन गोरे यांनी जातीय सलोखा ठेवने गरजेचे असून सुप्रीम कोर्टाचे मंडळासाठी असणारे नियम काय असतात मुद्देसुत सांगीतले. बर्याच मुद्यावर गोरे यांनी मार्गदर्शन केले या मिटिंग मध्ये उपस्थित नगरसेविका योजना पाटील, भैय्या साहेब पाटील, मा. नगराध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र मोरे पंचायत समिती चे सभापती पप्पु पाटील, MSEB पाटील , नायब तहसीलदार देवकर , आजी माजी नगरसेवक सर्व  गणेश मंडळ चे अध्यक्ष व कार्यकर्ते व पोलिस पाटील,भडगांव शहरातील तरूण वर्ग व वयोवृद्ध तथा या मिटींगमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष, हेमंत विसपुते, अबरार मिर्झा,प्रमोद सोनवणे, आदी   पत्रकार उपस्थित होते. पोलिस कर्मचारी लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील  व पोलिस कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.