शिक्षक हेच विद्यार्थ्यांना घडवणारा आदर्श माणूस आदर्श व्यक्ती !

0 85

कासोदा(प्रतिनिधि)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुन नगर येथे शिक्षण परिषदेचे आयोजित करण्यात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केंद्रप्रमुख श्री रवींद्र लाडगे होते.या वनकुटे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री उमेश पाटील( लोकनियुक्त सरपंच) ,प्रमुख पाहुणे अण्णासो प्रमोद पाटील (अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ).गोरखनाथ सोनवणे( उपसरपंच वनकुटे) गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी,केंद्रप्रमुख रवींद्र लांडगे,शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश जाधव,उपस्थित होते.शिक्षक हेच विद्यार्थ्यांना घडवणारा आदर्श माणूस आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी धडपड करत असतात.असे सरपंच यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी प्रमोद पाटील व गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या शाळा ही इंग्लिश मीडियम शाळांशी स्पर्धा करीत आहेत.असे केंद्रप्रमुख म्हणाले. कासोदा केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती कमलबाई भगवान ढोले .मुख्याध्यापिका जि प शाळा अर्जुन्नगर.नंदलाल पाटील पांडुरंग चौधरीयांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.