Home पाचोरा दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाची तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास दिली परवानगी !

दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाची तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास दिली परवानगी !

अमळनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. या प्रकल्पामुळे शेतक-यांना शेतीपूरक दुग्धव्यवसाय करण्यास चालना मिळून शेकडो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सवार्नुमते हा दूध संघ स्थापन
करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आमदार स्मिता वाघ यांची मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करून त्यांच्यावर पुढील जवाबदारी टाकण्यात आली होती. त्यानुसार वाघ यांनी प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाकडे सुपूर्द केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार षिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप नेते उदय वाघ यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय दूध उत्पादकांची बैठक घेण्यात आली. यात आमदार वाघ व उदय वाघ यांनी संस्थेत सर्वपक्षीय पदाधिका-यांना संचालक म्हणून स्थान देण्याची भूमिका मांडली. यानुसार संघाच्या चेअरमनपदी
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे (गडखांब), व्हाईस चेअरमनपदी अमळनेर येथील उद्योजक महेंद्र सुदाम महाजन तर कार्याध्यक्षपदी महेश उत्तमराव पाटील (लोण) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर दूध संघाचे धोरण ठरविण्यात आले. बैठकीत बाजार समिती सभापती प्रफुल पवार, जि.प.सदस्या मीना पाटील, उपसभापती श्रावण ब्रम्हे, कृ.उ.बा.संचालक सुरेश पिरन पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, काशिनाथ चौधरी, गिरीश सोनजी पाटील, देखरेख संघ चेअरमन विक्रांत पाटील, मार्केटचे माजी संचालक कामराज पाटील, भटा पाटील, रामकृष्ण पाटील, विठोबा महाजन, भगवान कोळी, शेतकी संघ माजी संचालक प्रा.श्याम पाटील, जितेंद्र राजपूत, गुलाबराव पर्वत पाटील, विजय कहारू पाटील, शिवसेनेचे किरण पवार, सचिन योगराज पाटील, भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, सरचिटणीस जिजाबराव पाटील, एम डी.चौधरी, महेंद्र बोरसे, मधुकर कथ्थू पाटील, सदस्य नोदणी प्रमुख निवास मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित हो