newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

मा.प्रधान सचिव (सामाजिक न्याय विभाग) समवेत शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न.

- Advertisement -

मा.प्रधान सचिव (सामाजिक न्याय विभाग) समवेत शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न.

मुंबई – शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी मुंबई 32 या संघटनेचे बैठक संघटनेच्या वतीने दिव्यांग कर्मचारी हितार्थ मागण्यांचे निवेदन देऊन बैठकीचे आयोजनाची विनंती केल्यानुसार दि:24/07/2019 रोजी मध्यांतरानंतर ठीक 02.वा मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्री.दिनेश वाघमारे यांनी मंत्रालयात अपंग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां समवेत मंत्रालयीन प्रशासकीय अधिकार्यांसह बैठकीचे आयोजन केले होते.सदर बैठकीत दिव्यांग व्यक्तींच्या हितार्थ माणी क्र.1
दिव्यांग व्यक्तींचा नोकरीतील एकुण 4 टक्के अनुशेष विनाविलंब पुर्ण करणे,
दिव्यांग अधिकारी कर्मचार्यांना पदोन्नतीमधे एकुण 4 टक्के आरक्षण लागु करणे, मागणी क्र.2
शासकीय दिव्यांग कर्मचारानी प्रशासकीय सोयीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सोयीचे ठिकाणी बदली करण्याचे धोरण निश्चित करणे,मागणी क्र.3 दिव्यांग अधिकारी कर्मचार्यांना सहाय्यक उपकरणांचा पुरवठा करणे मागणी क्र.4 आंतर जिल्हा बदली मध्ये दिव्यांग शिक्षकांना प्राधान्य क्रम व स्वतंत्र टॅब उपलब्ध करुन देणे मागणी क्र.5 सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि.29/5/2019मध्ये नमुदनुसार केंद्रशासनाने सन 1998 मधील दिव्यांगासाठी आरक्षण दिले जाते या उक्तीप्रमाणे तरतुद जशीच्या तशी सुरू राहील असे नमूद असुन गट अ व गट ब च्या पदावरील पदोन्नतीसाठी आरक्षण करणे, मागणी क्र.6 शासन स्तरावर अंमलात सर्व घटनात्मक समित्या मध्ये दिव्यांग कर्मचारी यांच्या एक प्रतिनिधी नियुक्त करणे. मागण्यांची प्रतीपुर्ती करण्याविषयी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिवांनी संबंधित प्रशासकीय विभागांना सक्त आदेश देऊन मागण्यांच्या प्रतीपुर्तीचे आदेश नियमानुसार निर्गमित करण्यात आदेशीत केले जातील अशी चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

तर सदर बैठकीत संघटनचे सचिव मा.श्री.परमेश्वर बाबर यांनी मागणी प्रमाणे पुरावा सह विषयावर चर्चा विवेचन केले.तसेच बैठकीत संस्थापक संचालक तथा राज्य अध्यक्ष रविंद्र लोटन पाटील संस्थापक सचिव तथा राज्य उपाध्यक्ष श्री.विलास पिंपळे.राज्य कोषाध्यक्ष आर.टी.सैदाणे राज्य उपाध्यक्ष श्री.महादेव सरोदे यांनी सहभागी होवुन प्रशासकीय कार्यपद्धतीस अनुसरून चर्चा केली. तसेच या बैठकीला प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.तर अपंग कल्याण उपायुक्त श्री.संजय कदम यांच्या आभार प्रदर्शनाने बैठक संपन्न झाल्याचे प्रधान सचिव श्री.दिनेश वाघमारे यांनी आदेशीत करुन बैठक आयोजनाबाबत प्रशासनाच्या वतीने दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन बैठकीची सांगता झाली.या स्वरुपाची माहिती दिव्यांग कर्मचार्यांच्या हितार्थ संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवली आहे.

- Advertisement -