newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

28 लाखांचा गुटखा जप्त अमळनेर पोलिसांची कारवाई !

- Advertisement -

अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर पोलिसांची एका मागो-माग धडक कार्यवाही
अमळनेरात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सलग तीन मोठ्या कार्यवाही केल्या.
पोलीस निरीक्षक मोरे रुजू होताच 24 तासाच्या आत शहरातील नकली दारूचा कारखाना, गांजा आणि लगेच अमळनेर शहरातील चोपडा नाका जवळ लाखो रुपये किंमतीचा गुटखा पकडला
गुन्हेअन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आयसर गाडीतुन (MH-46 F 5462) मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्या प्रमाणे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह पोलीस कर्मचारी यांनी सापळा रचून आयसर गाडीसह गुटखा जप्त करण्यात आला.या कार्यवाही मुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर मालाचा पंचनामा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी किशोर साळूखे यांना पाचारण करण्यात आले असता पंचनामाअंती पकडलेला गुटखा हा एकूण 22 लाख 99 हजार व आयशर गाडीची किंमत 5 लाख असा एकूण मुद्देमाल सह 27 लाख 99हजार किमतीचा गुटखा पकडण्यात यश आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, एपीआय सदगीर, पीएसआय माळी, गुन्हे अन्वेषण चे शरद पाटील, संजय मकडू पाटील, ईश्वर सोनवणे, भटूसिंग तोमर, योगेश महाजन,मिलिंद भामरे, किशोर पाटील, सुनील पाटील(चालक), मधुकर पाटील(चालक) आदीनी पार पडले

- Advertisement -

- Advertisement -