bgchjgchkg fvhgvhgvhgvhjkgvjkhgvjhgvjh
अमळनेर धुळे रस्त्यावरील रेणुका टाईल्स च्या मागील बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त !

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर धुळे रस्त्यावरील रेणुका टाईल्स च्या मागील बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला असून दोन वाहनासह सुमारे सव्वा चार लाखाचा माल ताब्यात घेण्यात आला असून धुळ्याच्या एक आरोपी व अमळनेरच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अमळनेर हुन धुळे जाणाच्या रस्त्याच्या कडेला वीज मंडळ कार्यालयाच्या समोर रेणुका स्टाईल च्या मागे पत्र्याच्या शेड मध्ये रसायन टाकून बनावट देशी विदेशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे याना मिळाल्यावरून त्यांनी सपोनि प्रकाश सदगीर , आर जी माळी , पोलीस उप निरीक्षक गणेश सूर्यवंशी , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे , मिलिंद भामरे , सुनील पाटील , किशोर पाटील , शरद पाटील , ईश्वर सोनवणे , भटसिंग तोमर , सुनील हटकर , मधुकर पाटील ९ . पथक तयार करून दुपारी साडे तीन रास पत्र्याच्या शेड मध्ये छापा टाकले हितेश चंदूलाल बजाज वय 26 रा साक्री रोड धुळे
दारू भरत असताना आढळून आला . त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा कारखाना दिनेश भावसार , किरण रमेश ढवळे रा आर के नगर धुळे रोड अमळनेर यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले पोलिसांनी तेथिल दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या असता ४९ हजार ९२० रुपयांच्या देशी दारू टॅनगो पंच च्या २० बॉक्स , तसेच १४ हजार ४०० रुपयांच्या मॅक्डोल व्हिस्की चे २ बॉक्स , ६ हजार ७२० रुपयांचे इंपिरियल ब्लु , ६ हजार ७२० रुपयांच्या ७ प्लास्टिक कॅन , १० हजार २९० रुपयांचे ३५ लिटर मापाचे ७ कॅन रसायनाने भरलेले तसेच नंदी बँड च्या तीन स्पिरितच्या बाटल्या , ७० हजार रुपये किमतीची पजो रिक्षा व २ लाख रुपये किमतीची चार चाकी , तसेच एम एच १८ , ए एम २८८२ , एम एच १८ , ए व्ही ६०१७ , एम एच १८ , बी एफ ७९१९ आशा तीन मोटारसायकली सह खाली बाटल्या , बाटल्यांचा लेबल , गोण्या , डॅम आदी ४ लाख २३ नगर , ८२५ रुपयांचे माल जप्त करण्यात आला ‘ वा आरोपींविरुद्ध भादवी ३२८ , दारूबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा करण्यात आल एस आय राहूल लबडे करीत आहे