भडगाव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) काय भड़गांव आणि काय तो बाळद रस्ता काय ते रस्त्यांत खंड्डे सगळ ओके मात्र प्रशासन झोपेत शहरात अनेक ठिकाणी खंडे पडलेले आहेत या गोष्टींसाठी अनुदान आले, आमदार कोट्यातून, खासदार कोट्यातून पण तरी भडगाव शहरात ना गटारी, ना मुतारी ना संडास तर गलिच्छ झाले आहेत, पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी उपाययोजना नाहीत. त्याच दृश्य आजच्या पावसाचे एच कॉलोनी, जिजामाता शाळा, पोलीस वसाहत, शिवनेरी गेट, कब्रस्तान, स्मशान भूमी, बस स्टँड कडे जाण्यासाठी सुधा रस्ता शोधत शोधत जावे लागणार आहे. बाजूला असलेल्या गटारी व सांडपाणी यांचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास नाली लक्षात नाही आल्यास नवीन व्यक्ती एका मोठ्या अपघाताच्या दिशेने चालत आहे हे त्याला अपघात झाल्याशिवाय कळणार नाही आणि तोवर प्रशासनाला जागही येणार नाही. आपली सूज्ञ जनता राजकारण, काम, परिवार आणि रिकाम्या गोष्टींशीवाय काहीही करू शकत नाही एक दिवस एक आठवडा किंवा काही ठराविक दिवस किंवा महिने लक्षात ठेवते पुन्हा विसरून गुलामी करण्यास तयार राहते. अशी सुज्ञ,शिक्षित,उच्च शिक्षित समाज भूषण लोकांना खर तर जाहीर सत्कार करून सन्मानित करण्यात यायला पाहिजे कारण भडगाव शहराचा विकास न होण्यास हे देखील तेवढेच कारणीभूत असतात. रस्ते,गटारी, पथदिवे, शुद्ध पाणपुरवठा, वेळोवेळी शासनाच्या निर्देशनाचे योग्य पालन करून शासनाने वेगळी भूमिका घेऊन राजकीय लोकांची गरज न भासता पूर्ण कशी करता येईल यावर जर विचार केला तर या राजकीय मंडळी यांना कमाई करता येणार नाही. याची दक्षता जर घेतली तर राजकारण कदाचित राजकारण राहील त्यातून नक्कीच समाजकारण घडून येऊ शकते. भडगाव शहरात केटी वेअर, तथा भडगाव शहर ते भडगाव पेठ यास जोडणारा रस्ता आजवर मार्गी लागला नाही. भडगाव शहराचे नामकरण करत समस्यापुर असे ठेवावं कारण ते अधिक शोभेल नाव जसे गाव तसे. कुठे आणून ठेवलाय माझा महाराष्ट्र अस म्हणनाऱ्या लोकांनी अधिक विचार करावा स्वतः त बदल करा तर परिसर बदलेल आणि जर परिसर बदलला तर गाव बदलेल आणि असाच एक दिवस देश बदलेल. विचार करून योग्य मेंनिर्णय घेण्याची क्षमता ज्यात असेल जो विकासासाठी प्रयत्नशिल राहील असा उमेदवार हवा असे सामान्य नागरिकातुन बोलले जात आहे
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र