रान बाजार वेब सिरीजवर कारवाई करा; महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन केली मागणी
जळगांव(प्रतिनिधी)- रान बाजार वेब सिरीज मधून पोलीस खात्याची खालच्या पातळीत बदनामी केली जात आहे. त्यावर तात्काळ बंदी घालून रान बाजार वेब सिरीज चे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार ज्या सॉफ्टवेरवर वेब सिरीज चालू आहे ते सॉफ्ट येर या सर्व टीम वर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जळगांव जिल्हा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदरक्षणाय खलनिग्रहनाय या घोष वाक्याची शपथ घेऊन देशसेवेसाठी समाजसेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे खाकी मधील पोलीस हे काही मनोरंजन करण्याचा विषय
नाही. पोलीस खात्याच्या खांद्यावर आणि डोक्यावर अशोकस्तंभ दिला जातो. दुर्जनांचा नाश करून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे काम या पोलीस खात्याच्या
खांद्यावर आहे. या राज्यातील पोलीस खात्याची बदनामी या वेबसिरीज ने चालु केली आहे. रान बाजार वेब सिरीज मध्ये अनेक सिन मध्ये पोलिसांचा संबंध दाखवला आहे त्या सिन मध्ये पोलीस अमलदाराला खालच्या दर्जात दाखवले आहे. घाण घाण शिव्या पोलिसांना देण्यात आले आहे. यामुळे समाजाचा पोलीस खात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. वेबसिरीज मध्ये ज्यात वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलीस उचलून आणतात तो सिन पोलीस स्टेशन मध्ये दाखवला आहे. त्यात खूप खालच्या पातळी वर पोलिसांना दाखवले आहे.
या मुळे पोलिसांची प्रतीमा समाजात मालिन झाली आहे. अश्या सिरीज, सिनेमा यांच्यावर आताच आळा घातला नाही तर हे लोक पोलीस लाईन मध्ये गैरवापर दाखवतील. रान बाजार वेब सिरीज बनवणाऱ्या
निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार ज्यांनी ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर तात्काळ गुन्हे
दाखल करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रसंगी संघटनेचे जळगांव संपर्क प्रमुख कुणाल मोरे, जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, आरिफ पिंजरी, अकील शेख, कन्हैया मोरे, भूषण सुरळकर, चेतन निंबोळकर, लकी राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- सोशल मीडिया च्या माध्यमातून एक वटला मराठा समाज
- पाचोरा कॉंग्रेस ची आजादी गौरव पदयात्रा संपन्न !
- मुस्लिम बहीनीला हिंदु भावाची तिरंगा भेट
- पाचोरा शहरात तालुका कृषि अधिकारी, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पाचोरा व निर्मल सिड्स पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन.
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप मिठाबाई कन्या शाळेत बक्षीस वितरण
- राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नारीशक्तीची हर घर तिरंगा रॅली
- नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षासूत्र