newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

भुसवळात विहीर उत्खननात मानवी सदृश्य कवटी आढळल्याने खळबळ

- Advertisement -

हत्या की आत्महत्या ? घातपात की अघोरी कृत्य ? …तर्कवितर्काना ऊत ..
कवटी तपासणी करिता रवाना ..
भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील शिवाजी नगर भागात शितला माता मंदिराजवळ मागील बाजूस पन्नास वर्षापूर्वीच्या बंद पडलेल्या जुन्या सार्वजनिक विहिरीत पालिकेच्या वतीने गाळ काढण्याचे काम गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असतांना आज 18 जुलै रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान अचानक गाळा सोबत एक मानवी सदृश्य कवटी रहस्यमयरित्या मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली .

याबाबत सविस्तर वृत्त असे,की सध्या भुसावळात पाणी टंचाई सुरू असल्यामुळे नगरपालिका बंद पडलेल्या जुन्या विहिरींचा गाळ काढून त्या परिसरातील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून देत आहे . या अनुषंगाने विहिरीचा गाळ काढण्याचे काम शिवाजी नगर भागातील शीतला माता मंदिराजवळील जुन्या सार्वजनिक विहीरीचे आठ ते दहा दिवसापासून सुरु आहे . हे काम करीत असतांना आज अचानक दिनांक 18 जुलै 2019 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान कामगारांना गाळ उपसा करतांना गाळा सोबत मानवी सदृश्य वस्तु कवठी मिळाली ही बातमी वा-यासारखी शहरात पसरली . यामुळे चर्चेला उधान येत परिसरात खळबळ उडाली आहे .

- Advertisement -


नेमकी ही मानवी सदृश्य वस्तु कवटी कोणाची आहे? याची शहानिशा करण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास पवार तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप इंगळे,पोउनी मनोज ठाकरे, पोउनी दत्तात्रय गुळींग, सपोनि कीर्तिकर,सपोनि सारिका खैरनार,राजेश शिंदे, पोकॉ बापूराव बडगुजर, पो कॉ विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण,बंटी कापडने,जयेंद्र पगारे,पो कॉ आयज तसेच त्या भागातील नगरसेवक राहुल बोरसे व राजू सूर्यवंशी यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली
घटनास्थळी केला पंचनामा …

निरीक्षक देविदास पवार यांनी भुसावळ येथील नगरपालिकेचे डॉ.दिलीप इंगळे व तहसीलदार महेंद्र पवार यांना घटनास्थळी बोलावून मानवी सदृश्य वस्तूचा पंचनामा करून ही संशयास्पद कवटी सिव्हिल हॉस्पिटलला तपासनी करीता पाठविली आहे ..तसेच ही मानवी सदृश्य वस्त नेमकी कोणाची आहे ? हे स्पष्ट झालेले नसून फोरेंसिक लैब ला तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांना आव्हान …
विहिरीच्या जवळच शितला मातेचे मंदिर आहे तसेच या भागात सर्वधर्मीय समिश्र वस्ती आहे , आजकाल जादूटोणा व नरबळी सारखे अनेक प्रकार उघड़किस येत आहेत यामुळे हा प्रकार नेमका एखाद्या अंधश्रध्येचा प्रकार तर नसावा यासह ही हत्या की आत्महत्या आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले असून.ह्या मानवी कवटीचा शोध लावण्याचे नविन आव्हान पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.ही कवटी नेमकी कोणाची याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -