Home जळगाव जिल्हा वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात
(निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियानाची दिली माहिती)
शासन आदेशानुसार दि.१५ जून पासून राज्यात सर्व शाळा सुरू झाल्या.जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी निपुण भारत अंतर्गत पालक संपर्क अभियान उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.सुरवातीला इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिली च्या विद्यार्थी व पालकांसाठी शाळापूर्व तयारी दुसरा मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता.शाळेचे मुख्याध्यापक निलेश भामरे यांनी प्रास्ताविक केले,उपशिक्षक संदिप पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.शाळा पूर्व तयारी मेळाव्यासाठी एकूण ७ स्टॉल लावण्यात आले होते यात प्रत्येक स्टॉल वर अनुक्रमे विद्यार्थी नावनोंदणी,वजन उंची नोंद,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास,भाषा विकास,गणन पूर्व तयारी,साहित्य वाटप या एकूण ७ स्टॉल ची मांडणी करून यात विद्यार्थी,पालक सहभाग घेण्यात आला.यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्यात आलेत.शालेय पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना गोड खाऊ सोनपापडी देण्यात आली.कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश शिनगारे,उपाध्यक्ष भागवत घोरपडे,सदस्य इदबार तडवी,गुलाब तडवी,प्रकाश गोसावी,माजी सदस्य राहुल शिनगारे,अंगणवाडी सेविका नंदा पाटील,मदतनीस समशाद तडवी,स्वयंसेवक शाळेच्या माजी विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळा पूर्व तयारी उपक्रमात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवक विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला