Home जळगाव जिल्हा सावदा येथे भ्रमण लोक न्यायालयाचा आयोजीत कार्यक्रम झाला संपन्न!

सावदा येथे भ्रमण लोक न्यायालयाचा आयोजीत कार्यक्रम झाला संपन्न!

सावदा येथे भ्रमण लोक न्यायालयाचा आयोजीत कार्यक्रम झाला संपन्न!


*माहिती अधिकार अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितानवर होणार कारवाई?

“याप्रसंगी रावेर पंचायत समितीमध्ये “माहिती अधिकार” अर्जाची दखल घेतली जात नाही?या वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात माहिती देणे बंधनकारक आहे.असे होऊच शकत नाही? जर याबाबतचे पुरावे माझ्या समक्ष सादर केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असे बिडीओ मॅडम दिपाली कोतवाल यांनी सांगितले आहे.”

सावदा पालिका आरोग्य अधिकारी यांचे न्यायाधीशांनी टोचले कान?

“सदरील लोक अदालतीच्या सरतेशेवटी जन्म,मृत्यू,नोंदणी बाबत रावेर न्यायालयच्या १ प्रति आदेश न स्वीकारल्याने शहरातील त्रस्त लोकांनी थेट लोक अदालत मध्ये रावेर न्यायाधीश यांच्या समक्ष तक्रार वजा अर्ज दिल्यामुळे सदर आदेश न्यायालयाच्या सही शिक्क्याचा असून तो नोंदणी कृत करून घ्यावे असे न.पा.आरोग्य अधिकारी महेश चौधरीला समक्ष बोलावून आदेशित केल्याचा प्रकार घडलेला आहे.”सदर काम मार्गी लावण्यासाठी त्रस्त लोकांना माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी अनमोल सहकार्य केले.

सावदा प्रतिनिधी दिलीप चांदेलकर.

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे दि.१३ जुन २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह येथे लोकांना कायदेविषयक मार्गदर्शनाद्वारे कायद्याची माहिती व्हावी.तसेच कोर्टाची पायपीट न करता फिरत्या लोक अदालतीमध्ये आपले केसेच तंटे मिटवावे या चांगल्या हेतूने रावेर विधि सेवा समितीमार्फत सावदा येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त अशी की, लोक न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याआधी रावेर न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.यादव यांचे सत्कार सावदा पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. देविदास इंगोले यांच्या हस्ते व बिडीओ मॅडम दिपाली कोतवाल पं.स.रावेर व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभारी शिंदे मॅडम यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी केला.रावेर वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विधी तज्ञाकडून बाल कामगार व मोटर व्हिकल ॲक्ट सह विविध कायदेशीर बाबी वर मार्गदर्शन करण्यात आले असून फिरत्या लोक न्यायालयाचे कामकाजाची सुरुवात करण्यात आले यात कलम १३८ अन्वे चेक बाउन्स दोन आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत एकूण १८ व कौटुंबिक हिंसाचाराचे २ दावे निकाली निघाले.सदरील संपूर्ण केसेसच्या निपटाऱ्यात दोन लाख दहा हजार यापैकी ४००० /रूपेय पक्षकारास अदा करण्यात आल्याचे समजते.याप्रसंगी न्यायालयीन अधीक्षक अरुण सुगंधीवाले,कलर्क डी.जी इंगळे, बारी ,शिपाई भगवान पाटील, विधी तालुकाध्यक्ष ॲड.सांगळे, सचिव ॲड.विचवे,उपाध्यक्ष जोशी,धनराज पाटील,मेढे व पंच म्हणून यांच्यासोबत आलेले बाळकृष्ण पाटील, तसेच शहर व परीसरातील नागरीक माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्गादास धांडे,मेहताब शेख, शहीद अब्दुल हमीद संस्थेचे अध्यक्ष मुक्तार शेख,उपाध्यक्ष फिरोज खान,सातपुडा जर्नलिस् फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार श्याम पाटील,युसुफ शहा,प्रवीण पाटील,पिंटू कुलकर्णी,फरीद शेख,दिलीप चांदेलकर इत्यादी उपस्थित होते.