newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पत्रकारावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल .!

- Advertisement -

पारोळा – पत्रकारावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल पारोळा शहरातील मध्यवस्तीत विद्यानगर येथे केबलचे काम पाहण्यासाठी गेलेले पत्रकार श्री बाळू पाटील व त्यांचे मित्र दीपक भावसार पत्रकार हे उभे असताना त्याच वेळेस पारोळा शहरातील नगरसेवक श्री महेश चौधरी यांनी कसलीही चौकशी न करता शिवीगाळ देण्यास सुरुवात केली व श्री बाळू पाटील यांना धक्काबुक्की करीत दूर लोटले श्री महेश चौधरी व त्यांच्यासोबत असलेल्या अज्ञात इसमा बाबत आज फिर्यादी बाळू पाटील पत्रकार यांच्या फिर्यादीवरून श्री महेश चौधरी नगरसेवक त्यांच्यावर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी बद्दल गुन्हा नोंदविण्यात आला सदर गुन्ह्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्या वतीने आज तहसीलदार गव्हाणे तसेच पोलिस निरीक्षक खैरनार यांच्याकडे पत्रकार संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर व कडक कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला सदर निवेदनाची प्रत प्रांत ,जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन देण्यासाठी जळगाव पाचोरा पारोळा भडगाव अमळनेर येथील पत्रकार बांधव उपस्थित होते यात हेमंत विसपुते योगेश आर पाटील अनिल पाटील छोटू सोनवणे रावसाहेब भोसले अभय पाटील योगेश पाटील अकबर बेग सय्यद बेग मिर्झा रमेश कुमार जैन प्रतीक भूपेंद्र मराठे प्रमोद सोनवणे किशोर रायस्कडा दीपक भावसार व बाळू पाटील हे उपस्थित होते

- Advertisement -

- Advertisement -