Home पाचोरा ठरलं ! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

ठरलं ! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार आहेत. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत.

संपूर्णपणे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु होणार की नाहीत अशी चिंता विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागून राहिली होती. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसतंय. दरम्यान, “कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे.” असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.