Home खान्देश महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा_

महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा_

महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा_

सावदा प्रतीनीधी (दिलीप चांदेलकर) -शिवा संघटनेने देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती शासनाला सुरू करायला लावली.तेव्हा पासुन जयंतीला मोठे सार्वजनिक स्वरूप येण्यासाठी, एक महिना जयंती द्विपंधरवाडा सुरू केली असून या वर्षीची जयंती द्विपंधरवाड्याचे उद्घाटन दि.3 मे रोजी जिंतूर येथे झाले आहे तरी जयंती द्विपंधरवाडा अंतर्गत महिनाभर महाराष्ट्र व इतर राज्यासह विविध सामाजिक कार्यक्रम,व उपक्रम घेऊन जयंती साजरी होत आहे.तरी या द्विपंधरवाड्याचा समारोप मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवार दि.१७ जुन रोजी सकाळी ११.00 वाजता होणार असून.
जयंती द्विपंधरवाडा समारोप समारंभ व शासनाच्या वतीने हे मागील६ वर्षा पासून(२०१६-१७ ते २०२२-२३) प्रतिवर्षी वीरशैव लिंगायत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस व एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार शासनाकडून दिला जाणार आहे
ह्या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे,
उपमुख्यमंत्री .अजित दादा पवार ओबीसी मंत्री .विजय वडेट्टीवार, ओ.बी.सी चे राज्य मंत्री . बच्चुभाऊ कडु शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे.
यावेळी राज्यातील मंत्री , आमदार, गणमान्य व्यक्ती, शिवा संघटनेचे राष्ट्रीय,राज्य, जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असुन.तरी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागातील शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते व वीरशैव-लिंगायत समाज बांधवांनी तसेच महात्मा बसवेश्वर प्रेमींनी दि.१७ जुन ला शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा व शासकीय महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार वितरण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .