Home खान्देश ” कृषिदूतां”नकडून सावदा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन

” कृषिदूतां”नकडून सावदा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन

” कृषिदूतां”नकडून सावदा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन

सावदा प्रतिनिधींनी /दिलीप चांदेलकर.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न गोदावरी फाउंडेशनसंचालीत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील ‘ कृषिदूत ‘सावदा येथे दाखल झाले असता ग्रामीण जागरूकता कार्यानुभय कार्यक्रमांतर्गत विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती , माती व पाणी परीक्षण तसेच कीड व रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन ,जनावरांचे संगोपन , शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाययोजना आदी विषयांचे सखोल विश्लेषणाची माहिती कृषिदूतांकडून समजून घेतली.या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेश चव्हाण ,किरण गरड ,कृष्णा देवरे,आशिष देशमुख ,कौशल चौधरी ,बग्गानगरी वामशीकुमार रेड्डी हे ‘ कृषिदूत ‘ सावदा ता.रावेर येथे काही दिवस मुक्कामी आहेत.पुढील दहा आठवडे पदवीत आत्मसात केलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून या परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून. यावेळी त्यांना सावदा शहर व परीसरातील प्रगतिशील शेतकरी व महसुली तलाठी शरद किसन पाटील यांच्या उपस्थितीत गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे , कार्यक्रम समन्वयक एम.ए. देशमुख तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गवांदे यांचे मार्गदर्शन लाभले.