Home खान्देश धुळे तालुक्यातील धाडरे गावात पत्रकारास माजी सरपंच चंद्रकांत गोरख पवार यांनी दिली जीवे ठार मारण्याची धमकी

धुळे तालुक्यातील धाडरे गावात पत्रकारास माजी सरपंच चंद्रकांत गोरख पवार यांनी दिली जीवे ठार मारण्याची धमकी

धुळे तालुक्यातील धाडरे गावात पत्रकारास माजी सरपंच चंद्रकांत गोरख पवार यांनी दिली जीवे ठार मारण्याची धमकी
सतिष पवार
धुळे- (सतिष पवार) – धुळे तालुक्यातील धाडरे येथील मा. लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गोरख पवार हे २०१८ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणुन निवडून आले मात्र ते एस टी प्रवर्गातून निवडून आल्यामुळे शासनाच्या नियमानुसार त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे हे बंधनकारक होते व तशा आशयाचे त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील निवडणूक आयोगाला सादर केले होते‌. निवडून आल्यानंतर तीन ते चार वर्षे पूर्ण होवुन देखील त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना मा. जिल्हाधिकारी साहेबानी दि १४/३/२२ रोजी अपात्र घोषित केले. सदरचा दावा धाडरे येथील रहिवाशी सतिष नामदेव पवार पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य यांनी दाखल केला होता. सदर प्रकार घडल्यामुळे चंद्रकांत गोरख पवार यांना खुपच वाईट लागले व ते सतिष पवार याना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देवू लागला कोणाच्या ही मोबाईल वरुन तुला मारुन टाकेल तुझ्या परिवाराला देखील मारेन अश्या प्रकारे धमक्या देत राहीला शेवटी दिनांक १/६/२२ रोजी दुपारी व रात्री आट वाजता सतिष पवार यांच्या आईची तब्येत खराब असतांना देखील त्यांच्या पत्नीला आईला व मुलीला घाण शिव्या देवु लागला त्यावेळी त्यांच्या हातात चाकु असल्या कारणाने सतिष पवार हे घाबरून आर्वी ओ.पी.चे पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांना फोन केला मात्र त्यांनी पोलिस स्टेशन ला या अश्या प्रकारे सल्ला दिल्यानंतर ते त्यांच्या पत्नी सोबत आर्वी येथे आले व तेथे देखील त्यांना धुळ्याला जावुन गुन्हा दाखल करा व नंतर कारवाई करू असा सल्ला मिळाला शेवटी धुळे तालुका पोलिस स्टेशन चे पी.आय शिंदे साहेब यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला रात्रीच्या बारा ते दोन च्या दरम्यान न्याॅशनल हायवे नंबर तीन वरुन जावुन गुन्हा दाखल झााला.मात्र हा सगळा प्रकार चालू असतांना चंद्रकांत गोरख पवार हे घराजवळ येवुन अशे भरपुर पत्रकार गेले काही होत नाही माझ कोणी काही करू शकत नाही आर्वी बीटचे सोनार हवलदार माझे मित्र आहेत ते मला अटक करू शकत नाही. त्यांच्यात सत्यता देखील आहे ज्यावेळी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते तेव्हाच सोनार हवलदार यांना चंद्रकांत गोरख पवार यांचे जिवलग मित्र मुन्ना पवार हे सारखे फोन करत होते व सोनार हवलदार हे त्यांचा फोन कट करत होते सदर बाब ही सतिष पवार ह्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सांगितले देखील फोन उचला व त्यावर त्यांनी उत्तर दिल की माझ शेतनांगरण्यासाठी फोन करत आहेत व सदर गुन्ह्याचा तपास देखील सोनार साहेबांन कडेच आहे पत्रकार हे आपल काम निर्भीड पणे करत असतात परंतु समाजातील असे नतभ्रष्ट लोक त्यांच्या वर हमले करतात त्यांच्या परिवाराला जिवे मारण्याच्या धमक्या देतात. जर चंद्रकांत गोरख पवार हे शासनाची फसवणूक करू शकता तर जनेतेची किती फसवणूक केली असेल हे तर त्यांच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई केल्यानंतर लगेच लक्षात येईल गुन्हा दाखल झाल्यानंतर जर त्याला त्याच्या मित्रा मार्फत पोलिस स्टेशन मधुनच निरोप येत असेल की तुझ्यावर गुुन्हा दाखल झाला तर तो पोलिसांना सापडन शक्यच नाही मग शेवटी सतिष पवार सारख्या गरिब पत्रकारांना दिलेली धमकी तो सत्यात उतरविनच यात या
तीळ मात्र शंका नाही शेवटी जिल्ह्याचे एस पी साहेब यांना विनंती आहे की गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या कर्मच्या-यांनवर कारवाई करणार का? व एका निर्भीडपणे काम करणाऱ्या पत्रकाराला संरक्षण देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर गुंड प्रवृत्तीच्या चंद्रकांत गोरख पवार वर जर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई झाली नाही तर पत्रकारांच भविष्य हे अंधारातच.हे त्रिवार सत्य.