Home जळगाव जिल्हा डख यांच्या कार्यक्रमास का फिरविली शेतकर्यांनी पाठ आमदारांनी व्यक्त केली खंत पाचोऱ्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी कमी शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामान विषयी केले मार्गदर्शन !

डख यांच्या कार्यक्रमास का फिरविली शेतकर्यांनी पाठ आमदारांनी व्यक्त केली खंत पाचोऱ्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी कमी शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामान विषयी केले मार्गदर्शन !

पाचोरा- पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटल येथे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामानविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील, थोरात , नानासाहेब प्रकाश पाटील ,संचालक डॉ विजय पाटील, डॉ नीलकंठ पाटील उपस्थित होते.

पाचोरा भडगाव तालुक्यात 7 जून ला मान्सून दाखल होणार असा अंदाज लावला तर पाचोरा शहरात प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांच्या अनेक हिताच्या गोष्टींची माहिती दिली. परंतु या कार्यक्रमास मोजक्याच शेतकर्यांनी उपस्थिती दिली . शेतकऱ्याबाबतचे त्यांचे अंदाज नेहमीच बरोबर ठरत असल्याचा विश्वास डख यांनी व्यक्त केला.“ मी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अभ्यास करतो म्हणून मला ढग दिसतात. माझे अंदाज तंतोतंत खरे ठरतात. शासनाच्या हवामान तज्ञांकडे आभ्यासासाठी मशिनरी आहेत तशा माझ्याकडे कमी आहेत. पण मी शेतकऱ्यांच्या हितासाठी अभ्यास करतो.” असे सांगत सर्व मुद्दे स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आमदार किशोर पाटील यांनी पंजाबराव डख यांचे कौतुक केले पंजाबराव डख ह्यांचे हवामान अंदाज तंतोतंत खरे ठरतात. डख यांनी वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजाचा मोठा फायदा महाराष्ट्रभर होतो तसेच तालुक्यातील शेतकरी थोडया प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांविषयी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांनी आपली परंपारिक शेती करीत असताना शेती नाहीतर व्यवसाय म्हणुन बघायला हवे. शेती करत असताना नियोजनबद्ध करावी. तालुक्यातील शेतकरीना मागील वर्षी वादळं आणि पावसाचा खूप त्रास सहन करावा लागला आ. किशोर पाटील व्यक्त केले तसेच डॉ. नीलकंठ पाटील यांनी आपले शेती विषय प्रेम व्यक्त केले.