Home पाचोरा भडगांव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जी.पी काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

भडगांव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जी.पी काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

भडगांव- प्रतिनिधि- (संजय शेवाळे) राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जी.पी काकडे यांच्या नेतृत्वात आंदोलन

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत दिली जिल्हाधिकारी यांना निवेदन जळगाव:- राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांच्या संघटनेने जळगाव जिल्हाधिकारी साहेब यांना दि २०/५/२०२२ रोजी संयोजक जी पी काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की पाचोरा तालुक्यातील एका छोट्याशा गावात अल्प प्रमाणात असलेल्या समाजातील वय वर्ष साधारण १२ ते १३ वर्ष हिच्या वर गावातील काही नर्धमानी सामूहिक अत्याचार केला व दि १५/५/२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास तिला गावातील महिला शौचालय जवळ सोडून दिली ती त्याच अवस्थेत घरी पोहचली आणि तिच्या सोबत घडलेला प्रकार घराच्याना सांगितला त्यानुसार पालकांनी लगतच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगार पैकी काहींना अटक करण्यात आलेली आहे तर काही फरार असल्याची माहिती मिळत आहे तसेच या घटनेत एक आरोपी हा अल्पवयीन आहे त्याच्यावर कुठलीच कार्यवाई न करता त्याच्या पालकांच्या स्वाधिन केले असल्याचे समजते
महाराष्ट्र् हा फुले, शाहू,आबेडकर यांच्या विचार सारणीचा आहे त्याच महाराष्ट्रात जेव्हा आशा घटना घडतात तेव्ह वाईट वाटते कुठल्या जाती समुदयावर अन्याय होणे वाईट वाटते प्रशासनाने या कडे बारकाईने लक्ष द्यावे
तसेच या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अल्पवयीन आरोपीला कायद्याचा वचक बसावा त्याच्या कडून भविष्यात मोठा गुन्हा घडू नये म्हणून त्याच्या कडे दुर्लक्ष नकरत त्याला बाल सुधार केंद्रात म्हणजे रिमांड होमला पाठवण्यात यावे फरार आरोपींना लवकरात लवकर जेर बंद करण्यात यावे. तसेच यात अपहरणाचा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात यावा सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम साहेब यांची निवड करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात पीडित कुटूंबाला शासकीय मदत जाहीर करून त्वरित देण्यात यावीपीडिय कुटूंबाला संरक्षण मिळावे पीडिय कुटूंबाला न्याय न मिळाल्यास संघटना महाराष्ट्र् भर संविधानिक पद्धतीने आंदोलन करले असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू भाऊ खरे बामसेफचे राज्य पदाधिकारी सुमित्र अहिरे यांनी समर्थन दिले निवेदन देताना उपस्थित समाज बांधव व काही संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कमलाकर सावकारे,राजू सोनवणे,प्रमोद काकडे,एस एस अहिरे,भवरे सर,गजानन नरवाडे, भास्कर शेवाळे,शशिकांत सावकारे,विठ्ठल सावकारे,राजेश वाढेकर,राजू सावकारे,पिंटू डोळसे, संजय वानखेडे,संदीप काकडे,सजय वानखेडे संदीप ठोसर,किशोर सोनवणे कैलास वाघ मोतीलाल पवार सुनील दहाडे नीलिमा सपकाळे बाबूलाल तायडे प्रकाश सावकारे कुंदन तायडे अजित भालेराव सुकलाल पैठणकर राजु खरे