Home खान्देश पद्मश्री उज्वलजी निकम यांच्या हस्ते लक्ष्मण शिरसाठ यांना मराठा सन्मान पुरस्कार !

पद्मश्री उज्वलजी निकम यांच्या हस्ते लक्ष्मण शिरसाठ यांना मराठा सन्मान पुरस्कार !

पद्मश्री उज्वलजी निकम यांच्या हस्ते लक्ष्मण शिरसाठ यांना मराठा सन्मान पुरस्कार
जळगाव – जगद्गुरु संत तुकाराम महाराज समन्वय प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज चोपडा यांच्या वतीने चोपडा येथील संजीवनी नगर मैदानात मराठा सन्मान २०२२ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांनी संभाजी सेनेच्या माध्यमातून केलेले उल्लेखनीय कार्य म्हणजे चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा आणि त्यासाठी त्यांनी हजारो कार्यकर्ते आणि शिवप्रेमींना सोबत घेऊन गेली अनेक वर्ष अनेक उग्र आणि तीव्र स्वरूपाची विविध रचनात्मक अशी विविध यशस्वी आंदोलने केली यासाठी त्यांना हा पुरस्कार पद्मश्री ज्येष्ठ विधिज्ञ मा. उज्वल निकम यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर माजी मंत्री व चेअरमन जिल्हा बँक,जळगाव,भाऊसाहेब विनोदजी पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते, बापुसाहेब कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, शैलजादेवी निकम, घनश्याम पाटील,एड.संदीप पाटील, एड.अनिकेत निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.