Home खान्देश धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार

धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार

धुळे तालुक्यात सहकारावर काँग्रेसचे वर्चस्व
वडणे सोसायटी चेअरमपदी भाऊसाहेब पाटील
आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी- सतिष पवार
धुळे ग्रामीण विधानसभा
धुळे- धुळे तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब शालीग्राम पाटील तर व्हा.चेअरमनपदी पुंडलिक जयराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध पार पडली होती. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.दरम्यान तालुक्यातील सर्वच सेवा सोसायट्यांवर काँग्रेसने झेंडा फडकविला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केले असून सर्वच सोसायट्यांवर काँग्रेसने झेंडा फडकविला आहे.नुकत्याच वडणे ता.धुळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर काँग्रेसने बिनविरोध वर्चस्व मिळविले आहे. त्यात चेअरमनपदी भाऊसाहेब शालीग्राम पाटील यांची तर व्हा.चेअरमनपदी पुंडलिक जयराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर संचालक म्हणून प्रकाश किसन पाटील, अनिल देविदास पाटील, चुडामण हरि पाटील, संजय बाबुलाल कोळी,राजेंद्र हेमकांत वाणी, भगवान नागो पाटील, सौ.भिकूबाई रामदास पाटील,गं.भा. ठगुबाई गोटन कोळी, सुपडू उंदा नागमल, रजेसिंग गुलजारसिंग गिरासे, गं.भा. पुष्पाबाई भोजराज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, आ.कुणाल पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले असून बिनविरोध निवडणूक केल्याबद्दल ग्रामस्थांसह पदाधिकार्‍यांचे कौतुकही केले. यावेळी आ.कुणाल पाटील यांच्यासोबत जवाहर सुतगिरणीचे व्हा.चेअरमन प्रमोदभाऊ जैन, ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील,माजी सरपंच भटू चुडामण पाटील,माजी सरपंच भटू गिरासे, स्वियसहाय्यक रामकृष्ण पाटील,बारकू पाटील,रघुनाथ कोळी, महेंद्र पाटील,भाऊसाहेब गिरासे, वसंत पाटील,भटू पाटील,हाटेसिंग गिरासे,खुमान भिल आदी उपस्थित होते.