Home पाचोरा पाचोरा तालुकातील कळमसरा घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतिने पाचोर प्रशासनास निवेदन देऊन जाहिर निषेध व्यक्त

पाचोरा तालुकातील कळमसरा घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतिने पाचोर प्रशासनास निवेदन देऊन जाहिर निषेध व्यक्त

भडगाव तालुका प्रतिनिधि (संजय शेवाळे) माणूसकीला काळीमा फासणारी घटना
जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुकातील कळमसरा या गावात १४ वर्ष अल्पवयीन मुलीला उचलून घेऊन गेले व तिच्यावर सामुहि क आत्याचार केल्याची घटना
दिनांक १४ रोजी उघडकीस आली आहे. मुलगी आपल्या मैत्रींनी सोबत बोलत होती त्या नंतर ती गायब झाली तिच्यावर पाच ते सहा जनांनी सामुहिक रित्या अत्याचार केला. व तिला पहाटे ३ वाजता महिलांच्या सार्वजनिक शौचालयाचे जवळ सोडून दिल्यावर मुलगी घरी आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला ही घटना अतिशय धक्कादायक,माणूसकीला काळीमा फासणारी व दुर्दवी आहे पोलीसांनी काही आरोपींना अटक केलेली आहे सदर घटनेचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतिने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला आहे व सर्व आरोपींना त्वरीत अटक करून सदर खटला फास्टट्रॅकवर घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पिडीत मुलीला व तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आप्पासो. श्री भानुदास विसावे यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा पोलीस प्रशासनास निवेदन देऊन जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
तसेच या वेळी आप्पासो.भानुदास विसावे यांनी पाचोरा पोलीस प्रशासनाला सांगितले की सदर घटनेत पिडीत परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा व दोषींना कठोर शिक्षा व्हावी नाही तर आम्ही संस्थापक अध्यक्ष नानासाहेब श्री बबनराव घोलप (मा.समाजकल्याण मंत्री) याचा नेत्रुत्वात महाराष्ट्र भर निवेदन व आंदोलन करू…
या वेळी समाज भुषण पांडुरंग आण्णा बाविस्कर (प्रदेश उपाध्यक्ष, RCM), जिल्हा अध्यक्ष श्री उत्तर मोरे (नाना), श्री धनराज पवार सर(राज्य सदस्य RCM),सौ. योजना ताई पाटील, सौ. लता ताई वाघ, सौ. सुरेखा ताई वाघ, श्री ईश्वर अहिरे, श्री रविंद्र अहिरे, डाॅ. समाधान वाघ, श्री नानी पटाईत,श्री नितीन तायडे, श्री गोवर्धन जाधव,श्री मधुकर वाघ, श्री सुभाष चिमणकारे सर,श्री मंगेश मोरे श्री मनोज पवार, श्री दिलीप अहिरे, श्री शांताराम वानखेडे श्री राजु सावंत,श्री वसंत वाद श्री सचिन सोमवंशी, श्री वासुदेव वारे श्री आय. एस. अहिरे व मोठ्या संख्येने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते