newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

भडगांव तालुक्यातील देव्हारी येथे ९ लाखाचा गांजा जप्त-जिल्ह्यात गांजा पकडण्याची पहिलीच मोठी घटना.

- Advertisement -

भडगांव प्रतिनिधी ( राकेश पाटील) : आज दिनांक १४ जुलै २०१९ रोजी गुप्त खबरीवरून भडगांव पोलिसांनी दुपारी १ वाजता कनाशी-देव्हारी येथे मक्याच्या शेतात पत्र्याच्या शेड मध्ये 437 किलो गांजा जप्त केला असून एक बुलेट गाडी नं एम.एच.२० डी.बी.१० व एक मोटरसायकल गाडी नं एम.एच.१९ बी.एच.५४५६ गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले दोन मोबाईल व रोख ९००० रू. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ४३७ किलो विक्री साठी साठवणूक केलेला सुमारे ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची हि जिल्ह्यातील पाहिलीच घटना असून याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली. यातील १ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी ,चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग ,यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे , चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , सपोनि जाधव ,पीएसआय अनंतराव पठारे , पो.ना.लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी ता. भडगाव या दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे . पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि रवींद्र जाधव करीत आहे. दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर आधीही गांजा पकडल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -